AdSense code अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी.

अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी.


 हाथरस  अत्याचार करणाऱ्या  आरोपीना फाशी दयावी

PRESS MEDIA LIVE :  कोल्हापूर :  प्रतिनिधी


हाथरस (उत्तरप्रदेश) येथील मनिषा वाल्मिकी या मुलींबर जातीयवादी नराधमांनी बलात्कार करून ठार मारले. या निष्पाप मुलीचा मृतदेह परिवाराला न देता तेथील प्रशासनाने परस्पर विल्हेवाट लावली या संपूर्ण घटनेमुळे देशभरातील आंबेडकरी समाज संतप्त झालेला आहे. 

    देशभरात दलित, मागास समाजावर वारंवार अन्याथ, जात्याचाराच्या घटना घडत आहेत. दिवसाढवळ्या मनिषा वाल्मिकी या मुलीवर अत्याचार करून जीवे मारणाऱ्या अशा जातीयवादी गावगुंडाना फाशी तर दयावीच पण त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना सुध्दा तसेच प्रशासनातील मुजोर अधिकारी यांना अटक करून त्यांची चौकशी व्हावी.मानवतेला काळीमा फासणाऱ्या सदरच्या अमानवी घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करत असून या प्रकरणातील दोषीना फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन मूलनिवासी संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दिलीप वायदंडे, भारत धोंगडे ,डॉ.शरद गायकवाड ,पंडित चोपडे ज्ञाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.

Post a comment

0 Comments