ब्रेकिंग न्यूज : एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार ...

 ठरलं! एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार .

PRESS MEDIA LIVE : मुंबई :  मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. यामुळे भाजपाला मोठा हादरा बसला आहे.

जयंत पाटील म्हणाले कि, एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचे आम्ही पक्षात स्वागत करत आहोत. शुक्रवारी दुपारी 2 वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल. प्रवेशानंतर त्यांना काय जबाबदारी दिली जाणार हे ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे. त्यांनी पक्षात येण्यासाठी कुठलीही अट ठेवली नसल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. एकनाथ खडसे पक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, असेही त्यांनी म्हंटले आहेख खडसे यांच्याबरोबर बऱ्याच जणांची यायची इच्छा आहे. पण करोनाकाळात विधानसभेच्या निवडणुका घेणं परवडणार नाही. पण खडसे यांच्या संपर्कात बरेच आमदार असल्याचे व यथावकाश अनेक आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असा गौप्यस्फोटही जयंत पाटील यांनी केला.

     एकनाथ खडसे यांना शुभेच्छा - भाजप

"आताच आम्हाला एकनाथ खडसे यांचा राजीनामा मिळाला आहे. त्यांच्याशी संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना शुभेच्छा आहेत," असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलंय.

तर खडसेंच्या राजीनाम्याविषयी अधिकृतपणे काही कळलेलं नाही. अद्याप राजीनामा आलेला नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील योग्य तो निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Post a comment

0 Comments