लेटेस्ट : मोठ्या रुग्णालयांना च वावडे.

 पुणे शहरातील मोठ्या रुग्णालयांनाच  वावडे.

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत चालढकल

PRESS MEDIA LIVE : पुणे :

पुणे – करोना संसर्गात 30 टक्‍क्‍यांपेक्षा कमी रुग्णांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ दिला, अशा सर्व रुग्णालयांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी नोटीस बजावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बड्या रुग्णालयांनाच या योजनेचे वावडे अधिक असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

राज्यात करोना प्रादुर्भाव वाढताच शासनाकडून बाधितांना केंद्राच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार देण्यास मान्यता दिली. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात खासगी आणि सरकारी अशी एकूण 78 हॉस्पिटलमध्ये या योजनेंतर्गत उपचार दिले जातात. यापैकी 52 हॉस्पिटल कोविडसाठी आणि 26 हॉस्पिटल नॉन कोविड रुग्णांसाठी आहेत. पुणे महानगरपालिका 16, पिंपरी-चिंचवड महापालिका 8 आणि ग्रामीण भागात 27 असे एकूण 52 रुग्णालयात ही योजना सुरू आहे. आतापर्यंत केवळ 8 हजार 227 रुग्णांना लाभ दिला. यामुळेच 30 टक्‍क्‍यांपेक्षा कमी रुग्णांना योजनेचा लाभ न दिलेल्या सर्व हॉस्पिटलला जिल्हा प्रशासनाने नोटीस दिली पाठवून खुलासा मागविला आहे.



जिल्ह्यात ससून, वायसीएम, लोकमान्य, औंध, नवले हॉस्पिटलमध्ये योजनेचा सर्वाधिक लाभ दिला आहे. तर ग्रामीण भागातील जिल्हा ग्रामीण रुग्णालय, जिल्हा उपरुग्णालयांमध्ये देखील नगण्य रुग्णांना योजनेचा लाभ दिला आहे. तर पुण्यातील रुबी, जहांगीर, पुना हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून सर्वांत कमी रुग्णांना योजनेचा लाभ दिला. त्यामुळेच 30 टक्‍क्‍यांपेक्षा कमी रुग्णांना योजनेचा लाभ देणाऱ्या हॉस्पिटलला नोटिसा देण्यात आल्या आहे.

– आयुष्य प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Post a Comment

Previous Post Next Post