मेळावा संपन्न.


कुंभोज येथे प्रहार संगटनेच्या वतीने  दिव्यांग व्यक्तींचा मेळावा संपन्न.  ‌..PRESS MEDIA LIVE :  इचलकरंजी :  आनंद शिंदे

हातकणंगले तालुका मधील कुभांज येथे प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींचा मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे इचलकरंजी शहर अध्यक्ष प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष सुनील पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार  संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री तुकाराम पाटील आपले विचार मांडले की तालुक्यांमध्ये जवळजवळ 45000 अपंग व्यक्ती आहेत या तालुक्‍यांमध्ये संघटना मजबूत नाही व नसल्यामुळे या तालुक्यातील अपंग लोकांचे बरेच नुकसान झाले आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील अपंगांना अपंगांचे दाखले काढण्याकरता कोल्हापूर सीपीआर ला जावे लागते आणि अपंगांना त्याचा फार त्रास सहन करावा लागतो म्हणून आमच्या प्रहार संघटनेच्या वतीने इचलकरंजी शहरांमध्ये जिल्हा दर्जाचे इंदिरा गांधी हॉस्पिटल येथे चालू करण्याकरता याच्यापूर्वी मागणी केली आहे तशी सोयीस्कर होईल अपंग व्यक्तींना कर्ज योजनेमध्ये जाचक अटी शिथिल करावेत अपंगांना घरपोच पेन्सिल मिळावी पन्नास किलो दर महिन्यात धान्य मिळावे कोरोना काळातील अपंगांचे लाईट बिल माफ व्हावे बरोबर ग्रामपंचायत नगरपालिका यांनी घर फळांमध्ये 50 टक्के सवलत द्यावी असे अनेक मागण्या आपण प्रहार संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत

प्रेस मीडियाचे पत्रकार व संत गाडगे महाराज ट्रस्ट अध्यक्ष आनंद शिंदे यांनी अपंगांचे दुःख व तळमळ असणारा शेतकऱ्याचा पोरगा आपले श्रद्धा स्थान नामदार श्री बच्चू कडू हेच आपले अपंगाचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून न्याय देतील ही काळया दगडावरची रेष आहे असे आपले विचार मांडले म्हणून आपण सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील अपंग व्यक्ती ने आमदार बच्चू कडू यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून आपल्यावर होणारे अन्याय थांबून आपल्याला न्याय व प्रश्न मार्गी लावून घ्यायचे आहे कार्यक्रमास नंदकुमार माळी उपसरपंच जहांगीर हजरत लालासो कोळी सुरेश कोळी दादा अंगारे शहानवाज मुजावर त्याचबरोबर पत्रकार विनोद शिंगे,तसेच संत गाडगेबाबा चारिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष सुभाष परिट, ग्रामपंचायतचे सदस्य अपंग महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments