वस्त्रोद्योग राज्यमंत्री यड्रावकर


 

रेशीम बीज कोष उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री केलेले कोष व नवीन अंडीपुंज उत्पादनाची रक्कम अदा करण्यासाठी ६२.७४ लाखांचा निधी वितरित - वस्त्रोद्योग राज्यमंत्री यड्रावकर.

PRESS MEDIA LIVE :  मुंबई :

मुंबई, दि.०६ : राज्यातील रेशीम बीज कोष उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कोषाची रक्कम अदा करण्यासाठी व नवीन अंडीपूंज निर्मितीसाठी महाराष्ट्र सरकारकडून आज तब्बल ६२.७४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. *यासंदर्भात राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सदर निधी वितरित करण्यास मान्यता दिली. त्यानुसार सदर निधी नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे संचालक यांना वितरीत करण्यात आला.*

राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार अंडीपुंजाचा पुरवठा व्हावा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे महाराष्ट्र सरकारचे तुती अंडीपुंज निर्मिती केंद्र आहे. अंडीपुंज तयार करण्यासाठी बीज कोषाची खरेदी या केंद्रामार्फत करण्यात येते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व आसपासच्या परिसरातील शेतकरी तुती रेशीम तसेच गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील  लाभार्थी तथा शेतकरी टसर रेशीम कोषाचे उत्पादन घेऊन अंडीपुंज केंद्रामध्ये विक्री करतात. कोरोनाकाळात सदर निर्मिती केंद्र बंद होते, मात्र रेशीम संचालनालयामार्फत शेतकऱ्यांना अंडीपुंजाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता. यादरम्यान राज्यातील रेशीम बीज कोष उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कोषाची रक्कम अदा करण्यासाठी शासनामार्फत निधीची आवश्यकता होती. याबाबत आज मुंबई येथे वस्त्रोद्योग राज्यमंत्री यड्रावकर यांच्याप्रमुख उपस्थितीत रेशीम कोष संदर्भात केंद्र शासनाकडून आलेल्या निधीमध्ये राज्य शासनाचे सहभाग अनुदानाची तरतूद करणेबाबत आढावा बैठक पार पडली. *त्यानुसार राज्यातील रेशीम बीज कोष उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कोषाची रक्कम अदा करण्यासाठी शासनामार्फत ६२.७४ लाख रुपये एवढा निधी नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे संचालक यांना वितरीत करण्यात आला आहे. तसेच केंद्रशासन पुरस्कृत सिल्क समग्र योजनेंतर्गतचा राज्याकडील निधी वित्त व नियोजन विभागाकडून उपलब्ध करून घेत रेशीम संचालनालयाला वितरित करणेबाबत वस्त्रोद्योग राज्यमंत्री यड्रावकर यांनी निर्देश दिले.* या बैठकीस वस्त्रोद्योग विभागाचे सचिव पराग जैन-नैनुटिया, कक्ष अधिकारी किशोर पाटील आणि रेशीम संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.

*राज्यमंत्री यड्रावकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरसह राज्यातील रेशीम बीज कोष उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कोषाची रक्कम त्वरित अदा करणे शक्य होणार आहे.* यांचा राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा मिळणार आहे.

Post a comment

0 Comments