नितिन परीट यांची शिरोळ तालुका अध्यक्ष पदी निवड - Press Media Live

Press Media Live

MSME NO ;MH26D0255607

Breaking

POST TOP ADD

POST TOP ADD

Tuesday, 6 October 2020

नितिन परीट यांची शिरोळ तालुका अध्यक्ष पदी निवड


 शिरोळ तालुका अध्यक्ष पदी नितीन परिट याची निवड झाली.

PRESS MEDIA LIVE :. इचलकरंजी : आनंद शिंदे :


समाजाचे नेते मा श्री बालाजी शिंदे व प्र. अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या विचारांने  व समाजाला न्याय देण्याकरिता तसेच नव युवकांना संघटित करण्यासाठी ही निवड करण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष श्री वसंतराव वाठारकर,कोर कमिटीचे सदस्य श्री सागर परीट यांच्या विचाराने जयसिंगपूर येथे जिल्हाध्यक्ष आनंदराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

डॉक्टर दशरथ भांडे समितीचा अहवालू केंद्र सरकारला पाठवणे व महाराष्ट्र शासनाला कोल्हापूर जिल्ह्याची जनगणना करण्याबाबत शिरोळ तालुक्याची  बैठकीमध्ये एकमताने विचार करण्यात आला. आणि महिला संघटन मजबूत करणे साठी विचार झाला.

पुढील कार्य करणेकरिताम्हणून भैरव कदम जयसिंगपूर जिल्हा उपाध्यक्ष,

मोहन परीट नवे दानवाड जिल्हा संचालक

बबनराव परीट जयसिंगपूर शिरोळ तालुका सल्लागार

प्रकाश परीट नवे दानवाड तालुका कार्याध्यक्ष

विशाल कदम शिरोळ तालुका सचिव

प्रकाश पाईकर जयसिंगपूर शहर अध्यक्ष याप्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली. सदर कार्यक्रमास  जिल्हा उपाध्यक्ष उदय शिंदे त्याचबरोबर इचलकरंजीचे संत गाडगे महाराज चँरीटेबल संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष परीट व अण्णा लक्ष्मण परीट हजर होते. कार्यक्रमाच्या शेवटी भैरव कदम यांनी आभार मांडले.

No comments:

Post a comment

Pages