AdSense code योगी सरकार बरखास्त करण्याची मागणी.

योगी सरकार बरखास्त करण्याची मागणी.


 हातरस मागासवर्गीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध जोरदार निदर्शने.यो

योगी सरकार बरखास्त करण्याची निदर्शनामध्ये घोषणा.


घोषणा

PRESS MEDIA LIVE : सांगली :


भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सांगली वतीने सांगलीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हातरस मागासवर्गीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध जोरदार निदर्शने*, 
निदर्शनाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. हाथरस येथील तरुण मुलीवर बलात्कार करून खून करून बळी घेणाऱ्या नराधमांना जबाबदार असणाऱ्या योगी सरकार बरखास्त करा! अशी निदर्शनांमध्ये घोषणा देऊन जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की,पीडित मुलीच्या कुटुंबीयांना संरक्षण द्या, हाथरस मधील उच्चवर्णीय गुंडांच्या कडून गुन्हेगारांना वाचवण्यासाठी ऑनर किलिंग चे हे प्रकरण आहे असे सांगून उलट पीडित मुलीच्या कुटुंबावर कारवाई करा अशी मागणी करणाऱ्या उच्चवर्णीय गुंड पुढाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम जातीवादी योगी सरकार करीत आहे. या बाबतीत उत्तर प्रदेश सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालून पुढील तपास गुन्हेगारांना शिक्षा होईल असे होऊ नये असे कारस्थान करीत आहे. या कृत्याचा आम्ही धिक्कार करीत आहोत.
पीडित मुलीच्या कुटुंबाला संरक्षण द्या. हाथरस मध्ये 14 सप्टेंबर रोजी मनिषा वाल्मिकी या मुलीस जबरदस्तीने घेऊन जाऊन चार नराधमांनी तिच्यावर बलात्कार करून तिची जीभ कापून तिचा खून केला.
 यासंदर्भात तातडीने  कारवाई करण्याच्या ऐवजी उत्तर प्रदेश योगी सरकार मार्फत गुन्हेगारांना शासनाकडून सातत्याने संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांच्या वर लाठीमार करण्यात आला. इतके करूनही विरोधी पक्षांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना या मुलीच्या कुटुंबांना भेटण्यास मनाई करण्यात आली.
 इतकेच नव्हे तर मनुवादी योगी सरकारने या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा अंत्यविधी करण्यासाठी तिच्या कुटुंबाला परवानगी देणे ऐवजी स्वतः मध्यरात्री पोलिसांनी अंत्यविधी देऊन सर्व पुरावे नष्ट करून हे प्रकरण योगी सरकार दडपू पाहत आहे.म्हणून या धर्मांध जातीवादी, अल्पसंख्य व मागासवर्गीय जनतेवर सतत क्रूर दडपशाहीचे कारस्थान करणाऱ्या, अल्पसंख्य तरुणांना खोट्या  एन्काऊंटर मध्ये अडकून बळी घेणाऱ्या लोकशाहीविरोधी योगी सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत.
              यानंतर बोलताना कॉ नंदकुमार हत्तीकर यांनी पक्षाच्या वतीने केलेल्या मागण्या सांगितल्या .भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत की,उच्चवर्णीय  गुन्हेगारांना पाठीशी घालून पुरावा नष्ट करून मागासवर्गीयांच्या वर अन्याय करणाऱ्या उत्तर प्रदेश योगी सरकार बरखास्त करा.    

           सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली या मागासवर्गीय पीडित महिलांच्या वर झालेल्या अत्याचाराची चौकशी करा. या भयानक अत्याचारास जबाबदार असणार्यांयांच्यावर तातडीने कारवाई करा. पीडित कुटुंबाला भेटून  जिल्हाधिकारी यानी कुटुंबाना धमकी दिल्याबद्दल या जिल्ह्याच्या जिल्हाअधिकाऱ्यास बडतर्फ करा. पीडित मागासवर्गिय मुलीच्या कुटुंबीयांना संरक्षण देऊन त्यांना योग्य नुकसान भरपाई द्या.असे न झाल्यास या पुढील काळातही भारतीय कम्युनिस्ट पक्षाला देशांमध्ये जोरदार आंदोलन करणार आहोत असे घोषित करण्यात आले.
 या आंदोलनामध्ये कॉ विजय बचाटे कॉ पुंडलिक कुंडले, कॉ वर्षा गडचे, कॉ मीनाक्षी कांबळे, कॉ तानाजी जाधव, कॉ सिराज शेख कॉ शोकत मुजावर, कॉ रोहिणी कांबळे कॉ शितल मगदूम कॉ प्रशांत नलवडे इत्यादींनी महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

Post a comment

0 Comments