AdSense code कोल्हापूर : स्वच्छता मोहीम

कोल्हापूर : स्वच्छता मोहीम


स्वच्छता मोहिमेमुळे श्री अंबाबाई मंदिर परिसर झाला चकाचक

शहरातील प्रमुख रस्त्यांची ही स्वच्छता करण्यात आली

PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर : प्रतिनिधी :कोल्हापूर - आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजच्या स्वच्छता मोहिमेत करवीर निवासिनी श्री अंबाबाई - श्री महालक्ष्मी मंदीर, हुतात्मा पार्क, व पंपहाऊस परिसर महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छ करुन चकाचक बनविला. आजच्या 76 व्या स्वच्छता मोहिमेत 3 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. नूतन महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आणि मावळते आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलेशेट्टी यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला.

आजच्या स्वच्छता मोहिमेचे वैशिष्टय म्हणजे आज श्री अंबाबाई मंदीर परिसर स्वच्छ करण्याबरोबरच शहरातील प्रमुख रस्त्यांचीही स्वच्छता करण्यात आली, आजच्या स्वच्छता मोहिमेचे वैशिष्टय म्हणजे श्री अंबाबाई मंदीर परिसरात नूतन महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन स्वत: स्वच्छता करुन कोल्हापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी तसेच पंपहाऊस जयंती नाला येथे नूतन महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आणि मावळते आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलेशेट्टी यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. तसेच या मोहिमेत सक्रीय योगदान देणाऱ्यांचा रोप देऊन सत्कारही आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यापुढेही स्वच्छतेची चळवळ अधिक गतीने राबवून कोल्हापूर शहर स्वच्छ सुंदर व आरोग्य दायी बनवण्याचा संकल्प व्यक्त केला.

यामध्ये प्रामुख्याने भगवा चौक ते शियेरोड, शेंडा पार्क ते सायबर चौक, कावळानाका ते शिरोली जकातनाका आणि रंकाळा टॉवर मेनरोड या प्रमुख रस्त्याच्या स्वच्छतेचा आजच्या स्वच्छता मोहिमेत समावेश होता. त्यामुळे या प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच रस्ता दुभाजकामध्ये वाढलेले गवत, झुडपे तसेच साचलेली माती काढण्यात आली. त्यामुळे हे प्रमुख रस्तेही स्वच्छ आणि सुंदर झाले आहेत.

याबरोबरच आजच्या स्वच्छता मोहिमेव्दारे शहरातील पंचगंगा नदी घाट परिसर तसेच पंचगंगा स्मशानभूमी परिसर, दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, शाहु स्मृती बाग परिसर, हुतात्मा पार्क परिसर अशा एकूण नऊ ठिकाणी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन कचरा व प्लास्टिक गेाळा करुन परिसर चकाचक केला. स्वच्छता मोहिमेत नागरिकांनीही उर्त्स्फुत प्रतिसाद देऊन रस्ता तसेच परिसर स्वच्छ करण्यास मोलाची मदत केली. तत्कालिन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून ही मोहिम अखंडपणे राबविली गेली. आजच्या स्वच्छता मोहिमेचे नियोजन नूतन महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी करुन शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले. महापौर सौ. निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांची प्रेरणा व प्रोत्साहनामुळे शहरामध्ये स्वच्छता मोहिम यशस्वीपणे राबवून कोल्हापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यसंपन्न बनविण्यास प्राधान्य दिले आहे.

स्वच्छता मोहिमेतून शहरातील गटारी, नाले, रस्ते, फुटपाथ, उद्याने तसेच प्रमुख चौकातील कचरा व प्लास्टिक गेाळा करण्याबरोबरच झाडे, झुडपे आणि कचरा काढून परिसर स्वच्छ आणि नेटका बनविला गेला. यामुळे स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनाचे कामही होत आहे. दर रविवारी राबविल्या जाणाऱ्या या स्वछता मोहिमेत महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच स्वयंसेवी-सेवाभावी संस्था, मंडळे तसेच संपूर्ण शहरवासियांनीही या अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

शहरात आज हाती घेतलेल्या स्वच्छता अभियानामध्ये 3 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. या मोहिमेचा 76 वा रविवार असून या अभियानामध्ये स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर व कार्यकर्ते, स्वच्छता दूत अमित देशपांडे, नागरिक व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करुन या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. मावळते आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलेशेट्टी, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, विकी महाडीक, क्रिडाई अध्यक्ष विद्यानंद बेडेकर व स्वरा फौंडेशन प्रमोद माजगावकर यांच्या हस्ते जयंती संप आणी पंप हाऊस येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्वरा फौंडेशनचे अजिंक्य पाटील, प्रमोद माजगावकर, उन्मेश कांबळे, आकाश कांबळे, मंगेश जाधव फैजान देसाई, योगेश्वर पाटील, आदित्य पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांचा सत्कार स्वच्छता दूत अमित देशापांडे यांनी केला. यावेळी स्वरा फौंडेशनचे कडून स्वामी समर्थ यांची मुर्ती भेट देण्यात आली. तर नुतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांचे स्वागत स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर यांनी शाल, श्रीफळ देऊन केले.या वेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे स्वागत स्वरा फौंडेशन प्रमोद माजगावकर यांनी शाल, श्रीफळ देऊन तर मावळते आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलेशेट्टी यांचा सत्कार स्वच्छता दूत अमित देशापांडे यांनी केले.

यावेळी वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत शुक्रवार पेठ शंकराचार्य मठ परिसरात देशी झाडांचे ब्रम्हा दंड टेंभुर्णी, करमाळा, कुंकू फळ, कडुलिंब, पायर, औदुंबर, कदंब, जांभूळ, हेळा, बिटी, पिंपळ, मोर आवळा, करंज, बेल अशा दुर्मीळ औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. यावेळी माजी महापौर सौ.माधवी गवंडी, डॉ.डी.वाय.पाटील कृषी विद्यापीठ विद्यार्थी, वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन स्वयंसेवी संस्था अध्यक्ष अमोल बुड्डे, सतीश कोरडे, अक्षय कांबळे, अमर पोवार, उदयसिंह जाधव, सौरभ पायशेट्टी, विशाल पाटील प्रसाद राऊत, अनुज वागरे, रोहन बेविनकट्टी, विकास कोंडेकर, अमित यादव व सदस्य, स्थानीक नागरिक, आरोग्य निरिक्षक उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करुन नागरीकांनी स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन आजच्या स्वच्छता मोहिमेत करण्यात आले. नागरीकांनी नियमितपणे मास्क वापरण्याबरोबरच सामाजिक अंतर पाळावे, साबनाने वारंवार हात धुवावे, गर्दीमध्ये जाऊ नये, कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करावी असे आवाहनही करण्यात आले. या मोहिमेत 3 जेसीबी, 4 डंपर, 4 आरसी गाडया, 2 औषध फवारणी टँकरचा वापर करण्यात आला. तसेच महापालिकेच्या 150 स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने मोहिम राबविण्यात आली.

यावेळी माजी महापौर सौ.हसिना फरास, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, उप आयुक्त निखील मोरे, माजी नगरसेवक आदील फरास, आरोग्यधिकारी डॉ.अशोक पोळ, शाखा अभियंता आर.के.पाटील, रामचंद्र काटकर, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर, आरोग्य निरिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. संकल्प दिला.

Post a comment

0 Comments