तपास सीबीआयकडे


 हाथरस मधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे

PRESS MEDIA LIVE :

नवी दिल्ली – हाथरसमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास आज सीबीआयने अधिकृतपणे स्वीकारला. सीबीआयने आज या प्रकरणी भारतीय दंड संहितेतील सामूहिक बलात्कार आणि हत्येशी संबंधित कलमांखाली ‘एफआयआर’ नोंदवली आणि स्वतंत्रपणे तपासास प्रारंभ केला, असे अधिकाऱ्यांनी संगितले. ‘सीबीआय’च्य गाझियाबादच्या शाखेअंतर्गत या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

हाथरसमधील 19 वर्षीय मुलीवर 14 सप्टेंबर रोजी चार जणांनी कथित सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेली ही युवती घटनेनंतर 15 दिवसांनी दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मरण पावली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या युवतीच्या पार्थिवावर घाईघाईने अंतिम संस्कारही उरकले होते.या युवतीचा मृत्यू आणि घाईघाईने करण्यात आलेल्या अंत्यसंस्कारांमुळे मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ निर्माण झाला होता. त्यातच बलात्काराचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटल्यामुळे लोकभावना अधिकच संतप्त झाल्या होत्या.या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणचा तपास “सीबीआय’ कडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘मुख्यमंत्र्यांच्या मते कोणावरही बलात्कार झाला नाही. कारण त्यांच्या लेखी अन्य भारतीय म्हणजे कोणीही नाही.’ असे त्यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

‘दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस म्हणूनही समजले जात नाही,’ असेही त्यांनी आणखी एका ट्‌विटमध्ये म्हटले आहे. 

Post a comment

0 Comments