पालक मंत्र्यांकडे मागणी.



 नाविन्यपूर्ण योजनेतून नवबौद्ध घटकांच्या वस्तीमधील बुद्ध विहारांमध्ये समाज मंदिरांमध्ये इंटरनेट सुविधा पुरवा .

आरपीआय जिल्हाध्यक्ष यांची पालकमंत्र्यांकडे मागणी


PRESS MEDIA LIVE :  सिंधुदूर्ग नगरी :

प्रसाद पाताडे

कोरोना महामारीमुळे मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून प्रत्येक अनुसूचीत जाती नवबौध्द घटकांच्या वस्तीमधील बौध्दविहारामध्ये, समाज मंदिरामध्ये इंटरनेटसुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी आर पी आय जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र शासनाने दिनांक २७ ऑगस्ट २०१४ च्या शासन निर्णयानुसार जिल्हावार्षिक योजनेअंतर्गत नाविण्यपूर्ण योजना राबविणेबाबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार आणि या नाविण्यपूर्ण योजनेतून अनुसूचीत जाती नवबौध्द घटकांसाठी १ ही योजना आतापर्यंत कोणत्याही विभागप्रमुख , कार्यालयप्रमुखांनी राबविलेली नाही असा आरोप त्यांनी सादर केलेल्या निवेदनात केला आहे.

तसेच सध्या कोरोना महामारीमुळे शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून प्रत्येक अनुसूचीत जाती नवबौध्द घटकांच्या वस्तीमधील बौध्द विहारामध्ये, समाजमंदिरामध्ये इंटरनेटसुविधा तात्काळ पुरविणेत यावी मागणी सादर केली आरपीआय जिल्हाध्यक्ष यादव यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post