इचलकरंजी :


इचलकरंजीत आत्मदहन केलेल्या सामाजिक कार्यकर्ते नरेश  सिताराम भोरे  यांचा मृत्यू.

इचलकरंजी नगरपालिका इतिहासातील पहिली घटना



PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास : 

इचलकरंजी पालिकेत आत्मदहन केलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचा उपचारादरम्यान सांगली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. नरेश सीताराम भोरे (वय ४८, रा. सोलगे, शहापूर रोड, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. याने सोमवारी दुपारी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले होते. यामध्ये तो भाजून गंभीर जखमी झाला होता. मृत्यूची माहिती समजताच नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्यांनी संबंधित दोषींवर कारवाई जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात नकार दिला. त्यामुळे हॉस्पिटल परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे याला घंटागाडी चालक अमर लाखे (रा. इचलकरंजी) याने केलेल्या मारहाणी व मेलेले डुक्कर जबरदस्तीने घंटागाडीत उचलून टाकण्यास भाग पाडल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी आत्मदहन केले होते.

यामध्ये तो भाजून गंभीर जखमी झाल्याने बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या शिवाजीनगर व शहापूर पोलीस ठाण्याच्या तीन पोलिसांनी त्याला उपचारासाठी आयजीएममध्ये दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याच्यावर आयजीएममध्ये प्रथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. इचलकरंजी पालिकेच्या इतिहासातील पहिली घटना आहे. भोरे यांच्या मृत्यूची माहिती समजताच नातेवाईकांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली आहे. त्याने संबंधित दोषी घंटागाडीचालक लाखे तसेच पालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मनुष्य वाधाच गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मृतदेहताब्यात घेण्यास नकार दिल्याने याठिकाणी तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post