कला शिक्षक सागर जाधव यांचा आदर्श उपक्रम.


  कवठेएकंद येथे रंगावलीतून साकारली शिवभक्ती,  कलाशिक्षक सागर जाधव यांचा आदर्श उपक्रम, राज्यभरातून गौरव..  


PRESS MEDIA LIVE :  कवठे एकंद :  अमित कलावंत :

श्री.सिद्धराज देवालय कवठेएकंद येथे विजयादशमी दसरा उत्सवानिमित्त चिंचणी गांवचे प्रसिध्द राष्ट्रीय रंगावलीकार व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठेएकंद या शाळेचे आदर्श कलाशिक्षक श्री सागर कृष्णा जाधव यांनी रंगावलीतून कवठेएकंदच्या श्री सिद्धराजाची नेञदिपक पालखीसह शिवभक्ती व घरीच रहा सुरक्षित रहा समाजप्रबोधनपर या रंगावलीतून मेसेज देण्यात आलेला आहे साकारली सदरची रंगावली साकारण्यासाठी सुमारे १४ तास लाभले जाधव यांनी आजअखेर चिञकला,रांगोळी ,शिल्पकला,

माध्यमातून राज्य व राष्ट्रीय स्तरावर जनजागृती केलेली आहे .घरीच रहा सुरक्षित रहा कोरोनावर अनेक समाजप्रबोधन रंगावलीतून केलेले आहे यामध्ये एकोफ्रेंडली गणेश मुर्ती,पर्यावरण वाचवा, दारुबंदी,स्ञी भ्रूणहत्या,मुलगी वाचवा अशा अनेक उपक्रमाचा समावेश आहे.प्रत्येक संकष्टीला तासगांवच्या श्री गणेश मंदिरात सुमारे चार ते पाच वर्षे झाली अविरत अखंड प्रबोधनात्मक रांगोळीच्या माध्यमातून सेवा केली कुणाकडूनही एक रुपया न घेता .आदर्श कार्यकर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्वाच्या असलेल्या जाधव यांना यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.डिझीटलच्या दुनियेत चिञे व पोस्टर प्रदर्शन रांगोळी , मातीच्या मुर्ती लुप्त होताना दिसत आहेत.माञ या कला जाधव जपत आहेत.

पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आईवडीलांच्या डोळ्यांतून निघणाऱ्या आनंदाअश्रुंसाठी जगायचं असतं अशा ध्येयाने प्रेरीत झालेल्या आदर्श कलाशिक्षकांची गरज आज संपूर्ण देशाला आहे.त्यांनी प्रतिकुल परिस्थितीशी लढा देत आत्मविश्वासाने कलाक्षेञात आजवर चौफेर घौडदौड सुरु ठेवली आहे .समाजकार्यातून चांगल्या समाजाची निर्मिती ,प्रत्येक भारतीय जाज्ज्वल्य देशप्रेमाने पेटून उठावा यासाठी कलाशिक्षक सागर जाधव यांची चाललेली धडपड खरंच कौतुकास्पद आहे …आपल्या या अखंड ,अभेद्य धडपडीस सदैव यश येईल असा आमचा विश्वास आहे एक आदर्श आणि कर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्व म्हणून भावी युवापिढी आपला आदर्श घेतच राहील…

Post a Comment

Previous Post Next Post