नगरपालिका बरखास्त करून प्रशासक नियुक्त करावा.

 नरेश भोरे यांच्या आत्मदहनाला जबाबदार असणाऱ्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.  व नगरपालिका बरखास्त करून प्रशासक नियुक्त करावा.

        अशी मागणी समता संघर्ष समितीने केली आहे.


PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी ( प्रतिनिधी ) :


इचलकरंजी नगरपालिकेच्या आवारात सामाजिक कार्यकर्ते नरेश सिताराम भोरे यांनी पालिकेच्या अत्यंत बेजबाबदार कार्यपद्धतीविरोधात आत्मदहन केले.त्यांनी पूर्वकल्पना देऊनही ही अतिशय लांच्छनास्पद घटना घडली हे गंभीर आहे. या घटनेने वस्त्रनगरीची  बदनामी जगभर कमालीची बदनामी झाली आहे. पालिकेतील  वाढता भ्रष्टाचार ,प्रशासनाचा मुजोरपणा ,अधिकाऱ्यांची मस्ती आणि सारे मिळून खाऊ ही विकृती या सर्व गोष्टी अलीकडे अतिशय वाढत आहेत व जनतेच्या चर्चेत आहेत.याबाबत अनेक सामाजिक संस्था,संघटना सातत्याने आवाज उठवीत असतात.निवेदने देत असतात. पण तरीही प्रशासन मुजोरीनेच वागते. म्हणूनच या आत्मदहनाला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक घटकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि नगरपालिका बरखास्त करून तेथे प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी समता संघर्ष समिती इचलकरंजी च्या वतीने करण्यात येत आहे.यामागणीसाठी उद्या सकाळी ११ वाजता इचलकरंजी नगरपालिकेच्या दारात निदर्शने करण्यात येणार आहेत.तसेच प्रांताधिकाऱ्यांना आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना निवेदनही देण्यात येणार आहे.तरी सर्व समविचारी नागरीक बंधू भगिनिनी बुधवार ता.२८ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिकेसमोर यावे असे आवाहन समता संघर्ष समितीच्या वतीने बजरंग लोणारी,प्रसाद कुलकर्णी,सदा मलाबादे,संजय कांबळे,शिवाजी साळुंखे , अभिजीत पटवा, मदन कारंडे, शशांक बावचकर, महादेव गौड,सयाजी चव्हाण ,विनायक चव्हाण, संजय रेंदाळकर ,प्रा. रमेश लवटे ,गणपती शिंदे, नाना पारडे, संजय अशोक कांबळे  ,अभिमन्यू कुरणे,  प्रमोद बेलेकर,  गोवर्धन दबडे, अण्णा शहापुरे  ,हेमंत वणकुद्रे  ,प्रताप पाटील , रवी गोंदकर , महेश लोहार  ,धोंडीबा कुंभार,  सुनील बारवाडे  ,पद्माकर तेलसिंगे,सुनील स्वामी , रोहित अब्दागिरे, मंगल सुर्वे , संतोष सावंत,  उषा कांबळे , पार्वती जाधव,  हनुमंत लोहार,  अजित मिणेकर, रोहित दळवी , अरुण कांबळे , दत्ता माने , भरमा कांबळे , शिवगोंडा खोत , अण्णा गुंडे,  शिवानंद रावळ,युसूफ तासगावे आदींनी केले आहे.


 वेळ : बुधवार ता.२८ ऑक्टोबर २०२०

         सकाळी ११ वाजता

  स्थळ : इचलकरंजी नगरपालिके समोर

   सर्वांनी मोठ्या संख्येने यावे ही विनंती.

Post a comment

0 Comments