पुन्हा बंद होणार का. ?


विना परवानगी सुरू झालेले

फॅशन स्ट्रीट बाजार पेठ पुन्हा बंद होणार का ?

PRESS MEDIA LIVE : पुणे :( मोहम्मद जावेद मौला) :

पुणे - कॅन्टोमेंट बोर्डाच्या परवानगी शिवाय फॅशन स्ट्रीट मधील काही व्यावसायिकांनी दुकाने सुरू केली होती. परंतु, बोर्डाने केलेल्या झोन पुनर्रचनेत फॅशन स्ट्रीट आणि कुंभारबावडी या बाजारपेठांचा भाग हा मायक्रो कंटेनमेंट झोन असल्याचे जाहीर केल्याने या बाजारपेठा उघडण्यास बोर्डाकडून परवानगी नाकारली आहे. त्यामुळे विनापरवानगी सुरू झालेली बाजापेठ पुन्हा बंद होणार का? अशी चर्चा आहे.

लष्कर परिसरातील करोना स्थितीचा आढावा घेत, पुणे कॅन्टोमेंट बोर्डाने कन्टेन्मेंट झोनची पुर्नरचना केली आहे. यानुसार लष्कर परिसरातील चार भाग हे मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.या नुसार, लष्कर परिसरातील भीमपुरा लेन नंबर 14,15 आणि 18, केदारी रस्ता, कॉन्व्हेंट रस्ता, एमजी रस्ता, घोरपडी श्रावस्ती नगर आणि घोरपडी गाव या भागांमध्ये करोनाचे रुग्ण आढळल्याने हे परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन पुढील 14 दिवस याठिकाणी लॉकडाऊनचे नियम लागू असतील.

दरम्यान, कॅन्टोन्मेंट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 18 ऍगस्ट ते चार सप्टेंबर या काळात परिसरातील बाधित रुग्णांची संख्या 163ने वाढली आहे. बोर्डात एकूण बाधित रुग्णांची संख्या 1275 इतकी आहे. यापैकी 1142 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या, बोर्ड परिसरात ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या 93 इतकी आहे. परिसरातील करोना स्थितीबाबत आम्ही सातत्याने आढावा घेत आहोत. तसेच, आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात असल्याचे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी सांगितले. करण्यात आले आहेत.

Post a comment

0 Comments