भारती विद्यापीठ

भारती विद्यापीठ आयएमईडी मधील  ७ दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम ची समाप्ती                                                                                        

रोजगार शोधणारे होवू नका,देणारे व्हा':व्यवस्थापन,संगणक शास्त्र विद्यार्थ्यांना 'सक्सेस मंत्र'!

PRESS MEDIA LIVE : पुणे. :

भारती विद्यापीठाच्या 'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट '(आयएमईडी')  च्या एमबीए ,एमसीए अभ्यासक्रमाच्या  २०२० या शैक्षणिक वर्षाच्या  नव्या तुकडीतील  विद्यार्थ्यांचा   ७ दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅमची समाप्ती ९ सप्टेंबर रोजी झाली. 

'रोजगार शोधणारे होवू नका,रोजगार देणारे उद्योजक व्हा',असा यशाचा मंत्र व्यवस्थापनशास्त्र,संगणक शास्त्र अभ्यासक्रमाच्या नव्या तुकडीतील  विद्यार्थ्यांना या इंडक्शन प्रोग्रॅम मधून देण्यात आला. भारती विद्यापीठच्या 'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट 'आयएमईडी'  च्या एमबीए ,एमसीए अभ्यासक्रमाच्या   २०२० या शैक्षणिक वर्षाच्या  नव्या तुकडीतील  विद्यार्थ्यांचा   इंडक्शन प्रोग्रॅम  २ ते ७ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची ओळख करून देण्यात आली,अभ्यासक्रमाची उद्दिष्टे समजावून सांगण्यात आली. मांयक्रोसॉफ्ट मीट द्वारे हा इंडक्शन प्रोग्रॅम  ऑन लाईन पार पडला.  

   'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट 'आयएमईडी'  चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी 'रोजगार शोधणारे होवू नका,रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हा',असा मंत्र व्यवस्थापनशास्त्र,संगणक शास्त्र विद्यार्थ्यांना या इंडक्शन प्रोग्रॅम मधून दिला . 

  सात दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम मधून डॉ पवन अगरवाल (मुंबई ),अतुल गेरा,अनिल सिंग,डॉ.उज्वल भट्टाचारजी,डॉ जयंत ओक,आनंद धर्माधिकारी,वृंदा वाळिंबे,डॉ प्रीतम तिवारी,कीर्ती पाटील यांनी  नव्या तुकडीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एमबीए ,एमसीए या अभ्यासक्रमांचे २५१ विद्यार्थी उपस्थित होते . 'आयएमईडी' च्या  पौड रस्तायेथील कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम झाला.

डॉ अजित मोरे,डॉ प्रवीण माने,डॉ सोनाली खुरजेकर,डॉ नेताजी जाधव,डॉ विजय फाळके,डॉ रजिता दीक्षित,डॉ सोनाली धर्माधिकारी,दीप्ती देशमुख,डॉ इंगवले यांनी संयोजन केले. 

------                                                                  

Post a comment

0 Comments