लोकजनशक्ती पार्टीचा पाठिंबा.


 नोंदणी आणि मुद्रांक विभाग कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास

 लोकजनशक्ती पक्षाचा पाठींबा


PRESS MEDIA LIVE : पुणे :

मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयोजित केलेल्या बेमुदत लेखणी बंद आंदोलनास लोकजनशक्ती पक्षाने  पाठींबा दिला आहे .

लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर -जिल्हाध्यक्ष संजय अल्हाट,प्रदेश सरचिटणीस अण्णासाहेब कांबळे,एड.अमित दरेकर   यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.१ ऑक्टोबर पासून हे लेखणीबंद आंदोलन सुरु होत आहे .पदोन्नती तत्काळ करावी,कोरोना साठीमध्ये जीवन सुरक्षा कवच लागू करावे,कार्यालयीन सुविधा पुरवाव्या ,सह दुय्यम निबंधक वर्ग २,दुय्यम निबंधक श्रेणी १ या संवर्गाचे एकत्रीकरण करावे या मागण्या तातडीने मान्य कराव्यात ,असे संजय अल्हाट यांनी या पत्रकात म्हटले आहे.

                                                        

  लोकजनशक्ती पार्टी तर्फे   जिल्हा मुद्रांक अधिकारी कोळेकर यांना निवेदन देण्यात आले .या निवेदनावर संजय अल्हाट,के सी पवार ,अशोक कांबळे,एड .अमित दरेकर ,संजय चव्हाण ,अंकल सोनवणे यांच्या सह्या आहेत .

Post a comment

0 Comments