सिंधुदुर्ग नगरी


 कोरोना बाधितांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेने उभारले जिल्हा रुग्णालया बाहेर मदत केंद्र

PRESS MEDIA LIVE  : सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी

       सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांना आवश्यक ती मदत करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना ओरोस विभाग प्रमुख नागेश ओरोसकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालया समोर कोविड १९ मदत कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

      सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यातील अनेक कोरोना बाधीत रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र उपचार घेत असलेल्या रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याबाबत रुग्ण आणि त्यांचा नातेवाईकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच रुग्णांना लागणारे ब्रश, टूथ पेस्ट, साबण आदी अन्य साहित्य काही वेळा रुग्णालयात उपलब्ध होत नाही. हे साहित्य त्यांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवसेना ओरोस विभाग प्रमुख नागेश ओरोसकर यांनी जिल्हा रुग्णालय समोर कोविड १९ मदत कार्यालय सुरू केले आहे. ज्या रुग्णांना काही समस्या असतील कीव्हा काही मदतीची गरज भासल्यास या मदत कार्यालयाशी रुग्ण किंव्हा त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा असे आवाहन नागेश ओरोसकर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post