राजकीय :

 एलआयसीही विकायला काढली! केंद्र सरकार २५ टक्के भागीदारी सोडणार

PRESS MEDIA LIVE :

        देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असणाऱ्या एलआयसीची 25 टक्के भागीदारी विकण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. वित्तीय सेवा विभागाने भारतीय जीवन विमा महामंडळीतील भागभांडवल विक्रीचा आराखडा तयार केला असून तो सेबी, आयआरडीए आणि एनआयटीआय आयोगासह संबंधित मंत्रालयांना पाठवला आहे.कोरोना काळातील एलआयसीच्या आयपीओतून मोठ्या प्रमाणात पैसे मिळवण्याची मोदी सरकारची योजना आहे. एकूण भागभांडवलापैकी 25 टक्क्यांपर्यंत सरकार वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये विकू शकते. आधी फक्त 10 टक्के हिस्सा विकण्याची योजना होती. मात्र यासाठी एलआयसी कायदा 1956 मध्ये बदल करणे आवश्यक आहे. संसदेच्या पुढील अधिवेशनात मनी बिलाच्या स्वरूपात यासंदर्भातील विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचा मनसे, भाजपाला एकाच वेळी धोबीपछाड, बड्या नेत्यांनी हाती बांधले घड्याळ

       मनसेच्या सांस्कृतिक विभागाचे ठाणे, रायगड, पालघर संपर्कप्रमुख डॉ. ओमकार हरी माळी आणि उद्योजक पंकज सिन्हा यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तर नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता दगडू फेम प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, अभिनेते डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदींसह इतर सहकलाकारांचा समावेश आहे. या कलाकारांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा सांस्कृतिक सेल अधिक मजबूत होणार आहे

Post a comment

0 Comments