चंदुर ग्रामपंचायत :


 मालमत्ताधारकांनी थकीत कर बाकी वेळेत भरून  सहकार्य करण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे आव्हान.

PRESS MEDIA LIVE :  चंदुर :

चंदुर तालुका हातकणंगले सन 2019साली महापूर आणि यावर्षी कोरोणा संसर्गामुळे चंदुर ग्रामपंचायती घरफाळा व पाणीपट्टी हे दोन्ही ही सर्वसाधारणपणे 70 ते 75 लाख रुपये थकबाकी असून 2020-21 सालातील सुमारे साठ लाख रुपये असे एकूण एक कोटी 30 ते 35 लाख लाख रुपयांची कर थकबाकी आहे. मालमत्ताधारकांनी ती वेळेत भरून सहकार्य करण्याचे आवाहन चंदुर ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे .यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पथक सोशल डिस्टन्स चे पालन करून गावातून कर जमा करण्यासाठी फिरत आहे .

             घरफाळा पाणीपट्टी हे ग्रामपंचायतीचे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे .ग्रामपंचायतीस शासनामार्फत 14 वा वित्त 15 वा वित्त इत्यादी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विकास निधी मिळत असतो.जरी विकास निधी मिळत असला तरी तो त्यासंबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो .गावची लोकसंख्या सुमारे 20 ते 25 हजार च्या आसपास असल्यामुळे गावाला दैनंदिन पाणीपुरवठा करणे ,त्याची देखभाल व दुरुस्ती करणे , कर्मचाऱ्यांचा पगार, स्वच्छता, ब्लिचिंग पावडर ,विज बिल, स्ट्रीट लाईट बल्ब इत्यादी व्यवस्थेसाठी  फार मोठ्या प्रमाणात निधीची गरज असते. ते भागवण्यासाठी  आत्ता प्रशासनाला फार मोठी कसरत करावी लागत आहे. गावातील स्वच्छता कार्यालयीन खर्च रस्त्यावरील वीजपुरवठा ब्लिचिंग पावडर, लाईट तुरटी इत्यादी नित्याची कामे ग्रामपंचायतीस करावीच लागतात. ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीस उत्पन्न असणे आवश्यक आहे ,पण गेल्या वर्षी आलेल्या महापुरामुळे व यावर्षीच्या तोरणा संसर्गामुळे घरफाळा व पाणीपट्टी इत्यादी कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न साध्य करता आले नाही. उत्पन्ना भावी ग्रामपंचायतीची अनेक बिले थकीत राहत असून त्याचा बोजा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे .थकीत बिलामध्ये प्रमुख्याने विज बिल चाळीस लाख ,कर्मचारी पगार नऊ महिने ,जलशुद्धीकरणासाठी लागणारे ब्लिचिंग पावडर, तुरटी इत्यादी चार लाख, स्ट्रीट लाईट चे दोन लाख ,व  वारंवार होणाऱ्या पाणी गळतीचा दुरुस्तीचा खर्च इत्यादी थकीत देणे आहे 

         भविष्यात गावातील पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट ,आरोग्य सुविधा व इतर सेवा सुरू राहण्यासाठी मालमत्ताधारकांनी घरफाळा व पाणीपट्टी वेळेत भरून सहकार्य करावे. असे आवाहन प्रशासक एन आर रामन्ना ,ग्राम विकास अधिकारी बि.व्ही. कांबळे व ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी यांनी केले .

Post a Comment

Previous Post Next Post