लाच लुचपतच्या जाळ्यात सापडले.


 लाचलुचपतच्या जाळ्यात

PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर :

कोल्हापूर : मटक्याच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यातील 'डीबी'चा प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अभिजित गुरवसह पथकातील कॉन्स्टेबलवर काल गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी ४० हजारांची लाच घेताना पंटरला दुपारी पकडले आहे. उपनिरीक्षक अभिजित शिवाजी गुरव, कॉन्स्टेबल रोहित राजेंद्र पोवार (बक्कल नंबर १६४१) आणि पंटर रोहित रामचंद्र सोरप (३२, रा. उजळाईवाडी) या तिघांवर गुन्हा नोंद केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी आज दिली.

याबाबत 'लाचलुचपत' विभागाचे उपअधीक्षक बुधवंत यांनी या कारवाईची दिलेली माहिती अशी राजारामपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे (डीबी) प्रमुखाची जबाबदारी संशयित पोलिस उपनिरीक्षक शिंगणापूर रोडवरील प्रताप मोरे हा राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर मटका जुगार एजंटाकरवी चालवतो. डीबी पथकाने नऊ सप्टेंबरला राजारामपुरी हद्दीत मटकाची कारवाई केली होती. यात एजंट कुणालवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मोरे राजारामपुरीतील दुकानात बसला होता. त्यावेळी तेथे उपनिरीक्षक गुरव, कॉस्टेबल पोवार व आणखी एक पोलिस गेले. तिघांनी मोरेला मोटारीत बोलवून घेतले. गुरवने कुणालवर दाखल गुन्ह्यात अटक करायची नसेल तर ६० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

पोवार व अनोळखी पोलिसाने 'साहेब, जे पैसे मागत आहेत ते द्यावेच लागलीत' असे सांगितले. तक्रारदार मोरेने घाबरून लगेच एटीएममधून २० हजार रुपये काढून पोवारकडे आणून दिले. त्यानंतर गुरवने राहिलेले ४० हजार रुपये पोवारकडे द्यावे, असे बजावले. याबाबतची तक्रारदार मोरेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. संबधित तक्रारीची विभागाने शहानिशा केली. त्यात गुरव व पोवारने तक्रारदाराकडे ४० हजारांची लाच मागितल्याचे पुढे आले. अनोळखी पोलिसाने ही रक्कम देण्यास तक्रारदाराला प्रोत्साहन दिल्याचेही पुढे आले. त्यानुसार आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. गुरव, पोवार या दोघांनी प्रीतम नावाच्या व्यक्तीसह एका अनोळखी व्यक्तीमार्फत लाच मागून ती संशयित पंटर रोहित सोरपकडे देण्यास सांगितले. त्यानुसार दुपारी तीनच्या सुमारास राजारामपुरी पोलिस ठाणे परिसरातील एका पोहे सेंटरमध्ये सोरपला ४० हजारांची लाच घेताना पकडले.

राजारामपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत संशयित सोरपसह, उपनिरीक्षक गुरव, कॉन्स्टेबल पोवार या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गुरव व पोवारचाही शोध सुरू असल्याचे उपअधीक्षक बुधवंत यांनी सांगितले. ही कारवाई बुधवंत यांच्यासह पोलिस निरीक्षक जितेंद्र पाटील, कर्मचारी शरद पोरे, मयूर देसाई, रूपेश माने, विकास माने, अभिजित चव्हाण, संग्राम पाटील, चालक गुरव यांनी केली.

-कथा एका स्वाभिमानी बापाची अन्‌ जिद्दी मुलाची ; मुलगा प्राध्यापक तर बाप देतो चरणसेवा

        चार महिन्यांपूर्वीच चार्ज घेतला होता  

चार महिन्यांपूर्वी राजारामपुरी डीबी पथकाचे तत्कालीन प्रमुखांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी पोलिस उपनिरीक्षक अभिजित गुरवची नियुक्त केली होती. पदभार घेतल्यानंतर २० किलो गांजाची मोठी कारवाई केली. यात गांजाचे कोल्हापूर ते मिरज, पंढरपूर, ओडिशा कनेक्‍शन शोधून काढून वरिष्ठांची शाबासकी मिळवली होती. तोपर्यंतच हा प्रकार घडला.

                   घरासह कार्यालयाची झडती...

राजारामपुरी पोलिस ठाण्यातील डीबी विभागात गुरवसह पोवार होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पंटरला पकडले. तसे डी.बी. पथकात सन्नाटा पसरला. येथील इतर कर्मचारीही दाराला कडी लावून पोलिस ठाण्यातून बाहेर पडले होते. या पथकाच्या कार्यालयाचीही झडतीही लाचलुचपत प्रतिबंध विभागाने घेतली. तिघांच्या घरांची झडतीची प्रक्रिया विभागाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे बुधवंत यांनी सांगितले.

लाचेची मागणी केल्याप्रकरणी व स्वीकारल्याप्रकरणी तीन संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, यात संशयितांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

- आदिनाथ बुधवंत,उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गुरवकडे होती.

Post a comment

0 Comments