AdSense code राजाभाऊ कुलकर्णी यांची इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने

राजाभाऊ कुलकर्णी यांची इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने

PRESS MEDIA LIVE :

 नांदेड येथे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे राजाभाऊ शेषराव कुलकर्णी यांची नवी दिल्ली येथील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन च्या मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ही भारत सरकारच्या मान्यतेने काम करणारी, संपूर्ण भारतातील सर्वात मोठा पत्रकार परिवार असलेली संस्था असून पत्रकारांसाठी काम करणारी विश्वसनीय संस्था असा या संस्थेचा नावलौकिक आहे. अशा या संस्थेच्या  मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी  राजाभाऊ कुलकर्णी यांची अभिनंदनीय निवड  करण्यात आली आहे. याबाबतचे निवडीचे पत्र आणि ओळख पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले.

राजाभाऊ कुलकर्णी हे गेल्या अनेक वर्षांपासून  पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या बाबींना प्रकाशात आणण्याचे काम आपल्या अनमोल विचार या वृत्तपत्राच्या माध्यमातून करत आहेत.

मुलांवर तसेच युवा पिढीवर चांगले संस्कार व्हावेत, समाजातील तेढ नाहीशी व्हावी, समाजात एकी नांदावी आणि प्रत्येकाने आपल्या चांगल्या विचारसरणीने समाजात वावरताना एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जावे यासाठी अनमोल विचार हे वृत्तपत्र दीपस्तंभा प्रमाने कार्य करत आहे.

चांगले विचार हा उद्याच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया आहे, हेच ब्रीद घेऊन राजाभाऊ कुलकर्णी हे पत्रकारितेच्या माध्यमातून भगीरथ प्रयत्न करत आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन या संस्थेने त्यांची मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या  निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a comment

0 Comments