इचलकरंजी पोलीस विभाग

 निवेदन-पोलीस विभाग इचलकरंजी

    

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास :

  जिल्ह्यात व शहरात कोरोना रुग्णाची वाढती संख्या व नागरिकांची नियम पाळण्यात दिसून येणारी कमतरता यामुळे मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आज पुढील आदेश निर्गमित केले आहेत.

1) सर्व शासकीय व खाजगी आस्थापना, रस्त्यावरील व फिरते फळ व भाजी विक्रेते, दुकानदार, व व्यावसायिक आस्थापना यांच्याकडून *मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, हॅन्डग्लोज न वापरणे*, या करिता नगरपालिकेने आकरलेल्या *दंडाची रक्कम वसुलीचे अधिकार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना* दिले आहेत. त्याची अंमलबजावणी उद्या दि 14/9/20 पासून इचलकरंजी शहरात होणार आहे.

2) सोबतच रेस्टॉरंट, हॉटेल, ढाबा, घरगुती खानावळ, स्टॉल , या ठिकाणी फक्त पार्सल सुविधा देणे आवश्यक असून, पार्सल सेवा सर्व नियम पाळत रात्री 9 वाजता बंद करायची आहे. नियमाचे पालन न करणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हे तर बसून खाणे करिता विना मास्क बाबत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

            इचलकरंजी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की, वरील नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करू नये किंवा झाल्यास दंड वसूल करताना वाद घालून शासकीय कामात अडथळा निर्माण करू नये.

                         गणेश बिरादार 

                               Dysp

                            इचलकरंजी

Post a Comment

Previous Post Next Post