विद्यार्थिनीचे नाव व धर्म बदलण्याचा अधिकार आयडियल एज्युकेशन ट्रस्ट ला कोणी दिला ?




आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित यासिन इनामदार  या  शाळेच्या व्यवस्थापनाने साक्षी सुनील सोनवणे विद्यार्थिनीचे धर्म व नावच बदलून टाकले.

तीला सना बाबा शेख असे नाव देण्यात आले.


शाळा  व्यवस्थापनावर ॲट्रॉसिटी व इतर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे सोनवणे यांची मागणी

PRESS MEDIA LIVE : हडपसर :

शाळा व्यवस्थापना वर ॲट्रॉसिटी व इतर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सोणावने यांची मागणी. हडपसरसय्यद नगर येथील आयडीयल एज्युकेशन ट्रस्ट संचालित यासीन इनामदार या शाळेच्या व्यवस्थापनाने साक्षी सुनील सोनवणे या विद्यार्थीनीचे धर्म व नाव बदलून तिला *सना बाबा शेख* असे नाव दिले,



या नावामुळे तिचे 11वीचे शैक्षणिक वर्ष व आयुष्य बरबाद होत आहे.

एखादा काना मात्रा चुकलातर    आपण त्याला चुक समजु शकतो पण येथेतर नाव व धर्म बदलले गेले.ही चुक नव्हे  बळजबरी झाली.अश्यांवर तर कारवाई झालीच पाहिजे.सदरील विद्यार्थिनीने समता प्राथमिक विद्यामंदीर या शाळेत सहावी मध्ये प्रवेश घेतला होता व पुढील शिक्षण

         यासिन इनामदार विद्यालयात केले.

  तिचे नाव *साक्षी सुनील सोनवणे* असे आहे , परंतु शाळेने तिचे नाव व धर्म बदलले असल्याचे तिची आई सुनिता सोनवणे यांनी तकरारीत म्हटले आहे .

नाव बदल्याची माहिती मिळताच सुनिता सोनवणे हे मागील चार वर्षांपासून नाव बदलुन मिळण्यासाठी पाठपुरावा करत असून ट्रस्ट चे अध्यक्ष शफी इनामदार व त्याच्या मुलांनी त्या अल्पवयीन मुली समोर मनास लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले,

 *क्यो बिना वजह नाम बदली कर रहे हो ,बच्ची का नाम मत बदलो तुम्हारी बच्ची की शादी मै हमारे मजहब मे कराता हु, मै शादी का खर्च भी करता हु फिकर मत करो , मै विधवा औरतों की मदत करता हु 


असे बोलून त्या विधवा महिलेचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.सदरील व्यक्तीवर ऍट्रॉसिटी अंतर्गत व इतरफौजदारी कलमान्वये कारवाई करण्याची मागणी सुनिता सोनवणे यांनी केली आहे.या शफी इनामदार ने बळजबरीने किती असहाय्यांचे धर्म परिवतन केले त्यासर्वांनच्या चौकशी ची मागणी होत आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post