असे आवाहन करण्यात आले आहे.


पुण्यात लॉकडाऊनबद्दल महापौर, पालिका प्रशासनाने  यावर विश्वास ठेऊ नये असे आव्हान करण्यात आले आहे.

PRESS MEDIA LIVE : पुणे :  मोहम्मद जावेद मौला:

 शहरात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. या आधीही प्रतिबंधित क्षेत्राची यादी जाहीर झाली होती, तेव्हाही पुन्हा लॉकडाऊन होणार अशी अफवा पसरली होती. पण, यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन महापौर आणि प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

“शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याचे वृत्तवाहिन्यांच्या जुन्या बातम्यांच्या क्लिप्स वापरून अफवा “व्हायरल’ केल्या जात आहेत. यात कोणतेही तथ्य नसून, महापालिका आणि प्रशासनाच्या पातळीवर असा कोणताही विचार नाही. असे संदेश तुम्हांला आल्यास ते “फॉरवर्ड’ करण्याचे टाळावे,’ असे आवाहनही महापौरांकडून करण्यात आले आहे.

“दुकानेही बंद केली जाणार आहेत. हा लॉकडाऊन तीन आठवड्यांसाठी असणार आहे. याशिवाय पोलीसच येऊन सांगत आहेत की पुन्हा लॉकडाऊन होणार आहे,’ अशीही अफवा व्यापाऱ्यांमध्ये पसरली आहे.

दोन महिन्यांपूर्वी लॉकडाऊनची घोषणा झाली होती, त्यावेळी वृत्तवाहिन्यांमध्ये ज्या बातम्या दाखवल्या होत्या त्याच्या क्लिप्स या अफवांबरोबर पसरवली जात आहे. त्यामध्ये कोणतीही तारीख दिसत नसल्याने नागरिकांचा त्यावर विश्वास बसत आहे. अनेक सजग नागरिकांनी वृत्तपत्रांच्या आणि वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयात या संबंधी खात्री करून घेण्यासाठी संपर्क केला. मात्र काहींनी अंधपणे या संबंधीच्या बातम्या “फॉरवर्ड’ केल्या. त्यामुळेच ही अफवा वेगाने पसरली.

Post a Comment

Previous Post Next Post