विक्रम शिंगाडे यांची साक्ष होणार..


 बेडकिहाळ ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचार संबंधी उद्दा सत्र न्यायाधीश व संबंधित विशेष अधिकारी,  बेळगाव येथे जिल्हा अध्यक्ष  विक्रम शिंगाडे यांची साक्ष होणार.

PRESS MEDIA LIVE : बेडकिहाळ :
( विक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी )
  

 बेडकिहाळ ग्राम पंचायतीमध्ये २०१७ ते २०१८  या  वर्षात विविध घरकुल वसती योजना व स्वच्छ  भारत मिशन योजने अंतर्गत होणार्या शौचालय निर्माणमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार विशेष अधिकाराच्या चौकशी मध्ये आढळुन आल्यामुळे उद्दा दिनांक १८-९-२०२० रोजी सकाळी ११ वा. बेडकिहाळ ग्राम पंचायतीचे ग्राम विकास अधिकारी (P.D.O) के.ए.मोमीन यांच्या विरोधात विक्रम शिंगाडे हे पुराव्या सहीत  विशेष अधिकारांच्या समोर उद्दा साक्ष देणार आहेत. 
   २०१७ ते २०१८ मध्ये दलित संघर्ष समीती व बेडकिहाळातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्राम पंचायत वर धडक मोर्चा काढुन तहशिलदार व ता.पं. कार्यनिर्वाहक अधिकारी यांना भ्रष्टाचार झालेल्या संबंधि निवेदन देऊन चौकशी करन्यास भाग पाडले. बेडकीहाळ ग्राम पंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उद्दा बेळगाव येथे निर्वुत जिल्हा न्यायाधीश ए.एम.पत्तार व सत्र न्यायाधीश आयोग यांच्या समवेत साक्ष होणार आहे.
  संपुर्ण निपाणी तालुक्याचे लक्ष या विषयाकडे असणार आहे.

Post a comment

0 Comments