लायन्स क्लब एस. टी. कर्मचाऱ्यांची काळजी घेइल


 लायन्स क्लब एस.टी. कर्मचाऱ्यांची काळजी घेईल: अभय शास्त्री

स्वारगेट एस.टी. कर्मचाऱ्यांना, प्रवाशांना मास्क वाटप.

PRESS MEDIA LIVE : पुणे :

' सीमेवर सैन्य ज्या धैर्याने कामगिरी बजावते, त्याच धैर्याने प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी. कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. सेवाभावी उपक्रमातून लायन्स क्लब एस.टी. कर्मचाऱ्यांच्याकरिता  कार्यरत राहील ', असे प्रतिपादन  लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री यांनी केले.

लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंडस, लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीमच्या वतीने स्वारगेट एसटी स्टँड,डेपोच्या कर्मचाऱ्यांना, प्रवाशांना कोविड पासून सुरक्षेसाठी मास्कचे वाटप प्रांतपाल अभय शास्त्री, पुनीत कोठारी , अनील मंद्रुपकर,सुहास कुलकर्णी ,रोहिणी नागवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनिता चिटणीस,प्रीती दीक्षित , महादप्पा अणदुरे,  प्रमोद उमरदंड  तसेच स्वारगेट डेपोचे अ धिकारी उपस्थित होते.

अभय शास्त्री म्हणाले, ' कोविड साथी मुळे  असाधारण परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉक डाऊनमुळे एस्.टी. सेवा बंद होती. ती आता सुरू झाली आहे.अशा वेळी असाधारण सेवा बजावणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतील.एकमेकांनी एकमेकांची काळजी घेण्याने सुरक्षितता वाढेल .'

कार्यक्रमाचे संयोजक अनील मंद्रुपकर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत  केले.
Post a comment

0 Comments