मुंबई. माजी पंतप्रधान दिवंगत भारत रत्न


माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती कायम  संस्मरणीय - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


PRESS MEDIA LIVE : मुंबई.

मुंबई दि.16 - भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती कायम प्रेरणादायी आणि संस्मरणीय आहेत असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिवंगत पंतप्रधान  अटल बिहारी वाजपेयी यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी विनम्र श्रद्धांजली वाहिली. 

दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शी माझे खूप जवळचे सबंध होते. ते तीन वेळा पंतप्रधान झाले त्या तिन्ही वेळी मी लोकसभेत खासदार होतो. ते पहिल्यांदा 1997 मध्ये 13 दिवसांचे पंतप्रधान झाले त्यानंतर 13 महिने आणि 1999 ते 2004 पर्यंत ते 5 वर्षे अशी मिळून 6 वर्षे ते पंतप्रधान राहिले. संसदेत जेंव्हा जेंव्हा आमची भेट व्हायची ते माझी मराठी भाषेत ते

 विचारपूस करीत असत. ते एनडीए मधील सर्व पक्षांना सोबत घेऊन काम करणारे पंतप्रधान होते. ते ओजस्वी अमोघ वक्ते ;तेजस्वी कवी ; प्रेरणादायी नेते होते. त्यांच्या स्मृती कायम संस्मरणीय आहेत अशा शब्दांत ना रामदास आठवले यांनी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.                

           

Post a comment

0 Comments