मुंबई. लालपरी ओलांडणार जिल्ह्यांची सीमा.



 लालपरी ओलांडणार जिल्ह्यांची सीमा.

पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांचे संकेत : उद्या घोषणेची शक्यता

PRESS MEDIA LIVE :  मुंबई : रामचंद्र राऊळ.

मुंबई – करोनामुळे गेले चार महिने सर्वसामान्यांसाठी बंद असलेली एसटी बसची सेवा आता लवकरच पूर्वपदावर येणार असल्याचे संकेत राज्याचे मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. सोमवारी याबाबतची घोषणा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अर्थात ही सेवा सुरु झाली तरीही प्रवाशांना करोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटोकेरपणे पालन करावे लागणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजीत पवारही अनूकूल आहेत. लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. अनलॉक प्रक्रियेत मर्यादित एसटी सेवेला परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सध्या 50 टक्केच प्रवासी असावेत या अटीवर एसटी सेवा सुरु आहे. असे असले तरी सध्या ही सेवा जिल्हांतर्गत आहे. त्यामुळे एसटी जिल्ह्याची सिमाही ओलांडेल असेही त्यांनी सांगितले.

     कोचिंग क्‍लासेसही सुरु होणार

राज्यातील कोचिंग क्‍लासेस करोना नियम पाळून प्रारंभ करण्याची सरकारची तयारी आहे. ज्याप्रमाणे जीम सुरू केल्या गेल्या त्याच धर्तीवर नियमांचे पालन करुन कोचिंग क्‍लासेस सुरू करण्याचा विचार आहे, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.

लोकल सेवाही सुरु करण्याचा विचार

करोनाचा धोका वाढत असल्याने गेल्या चार महिन्यांपासून ठप्प असलेली लोकल सेवा मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार असल्याचेही ते म्हणाले. सध्या अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी वर्गांसाठीच ही सेवा सुरु आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून मुंबईत सुरु असलेली सर्वसामान्यांची आंदोलने विचारात घेत काही नियम व बंधने लावून ही जीवनवाहिनीही सुरु करता येइल असेही वडेट्टीवार म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post