AdSense code मुंबई. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटस संघटनेचे

मुंबई. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटस संघटनेचे

 

आतंरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटस संघटनेचे माजी राष्ट्रीय संचालक सन्माननीय कै वामन भाई साळगावकर यांच्या जयंतीनिमित्त फळ वाटप कार्यक्रम संपन्न  

PRESS MEDIA LIVE  :  मुंबई:   रामचंद्र राऊळ.

मुंबई आतंरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स हि संघटना सन्माननीय अ‍ॅडव्होकेट विक्रांतजी वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली मागील कित्येक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून टाटा कॅन्सर पेशंट व त्यांच्या नातेवाईकांसाठी दर सोमवार व गुरुवारी मोफत अन्नदान, आश्रम शाळेतील लहान मुलांना फळे वाटप,विध्यार्थी गुरु गौरव, विद्यार्थी मार्गदर्शन, रक्तदान शिबीर, गरीब व गरजू व्यक्तींना मदत करणे अश्या प्रकारचे विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. 

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स  संघटनेचे आधारस्तंभ माजी राष्ट्रीय संचालक- कै.वामनभाई साळगांवकर साहेब, यांच्या जयंतीचे अवचित साधून त्यांच्या स्मरणार्थ  दिनांक ०९.०८.२०२० रोजी संत गाडगे महाराज आश्रम शाळा, दादर येथे कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फळे आणि बिस्कीट वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे कौतिक दांडगे अध्यक्ष,महाराष्ट्र बाजार पेठ समीर परब ,राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी IHRA सुनिल मोरे,माजी नगरसेवक विवेक साळवी,डायरेक्टर. प्रशांत देशमुख , संजय बाजे, महेश सरफरे ,शशांक भिरवंडेकर ,कमल नांगिया  मनीष सोनी  भूषण मांजरेकर, सौरभ किंजळस्कर, राजु सावंत  हे उपस्थित होेते.

Post a comment

0 Comments