मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  कोरोनाशी लढावे.

            देवेंद्र फडणवीस

PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर

कोल्हापूर, २९ ऑगस्ट: सरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवले जात आहे. पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढावे, अशा शब्दात राज्य सरकारवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी दुपारी कोल्हापूरच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना स्थितीची माहिती दिली. त्यानंतर दुपारी सीपीआर रुग्णालयाच्या कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोल्हापुरात ऑक्सीजन बेड वाढविण्याची गरज असल्याने यासंदर्भात आरोग्य मंत्र्यांशी आपण बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, समरजितसिंह घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोल्हापूर भाजपचे अध्यक्ष राहुल चिकोडे त्यांच्यासमवेत होते.

"जो उत्साह दारूची दुकानं उघडण्याचा आहे त्याच्या अर्धा उत्साह मंदिरं किंवा इतर धर्मांची धार्मिक स्थळं उघडण्यात सरकारनं दाखवावा. त्यावर सरकारनं निर्बंध घालावे. त्या ठिकाणी येणारे भाविक हे फिजिकल डिस्टन्सिंग पाळतील. लोकांनाही समजतं. ते जाऊन गर्दी करणार नाही. लोकांचा आस्थेचा विषय आहे," असंही त्यांनी नमूद केलं. सध्याची परिस्थिती अशी आहे की ज्यात लोकांना मानसिक आधारही लागतो. ज्या लोकांचा त्यावर विश्वास आहे त्यांना त्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मानसिक आधार मिळतो. धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा जो निर्णय आहे तो योग्य नसल्याचंही फडणवीस म्हणाले.

Post a comment

0 Comments