कोल्हापूर. नुसत्या रेशन कार्ड वरचे धान्य द्यावे

नुसत्या रेशन कार्ड वरचे धान्य द्यावे, ऑनलाइन नको.

PRESS MEDIA LIVE :  कोल्हापूर : 

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच्या काळात स्पर्शापासून लांब राहणे महत्त्वाचे आहे; पण रेशन धान्य दुकानात मात्र हाताचा अंगठा घेऊनच ऑनलाईन पद्धतीने रेशन दिले जात आहे. यातून कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती असल्याने नुसत्या रेशन काडार्वर धान्य द्यावे, अशी मागणी शाश्वत प्रतिष्ठानने पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनामुळे मोफत धान्यवाटप हे रेशन कार्ड दाखवल्यावर मिळत होते; पण आता ते बंद करण्यात आले आहे. याचा धान्य घेणाऱ्या नागरिकांसह विकणाऱ्या रेशन दुकानदारांनाही धोका आहे. हा प्रादुर्भाव कमी होत नाही तोपर्यंत फक्त रेशन कार्डावर रेशन मिळावे, अशी विनंती निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, राहुल चौधरी, संदीप जाधव, पृथ्वीराज जगताप, नीलेश कांबळे, संतोष परब, अजय पाटील, अविनाश टकळे यांचा समावेश होता..

Post a Comment

Previous Post Next Post