ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे गणरायाला साकडे.

–ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनाचे संकट लवकर दूर होणे साठी गणरायाला  घातले साकडे.

PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर :

कोल्हापूर – हे विघ्नहर्ता गणपती देवा! कोरोनाच्या जागतिक महामारीचे हे संकट लवकरात लवकर दूर कर, असे साकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री गणरायाला घातले. कागलच्या कोविड केअर सेंटरमध्ये दीड दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे . मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती झाली.

कोविड केअर सेंटरमध्ये गणपती प्रतिष्ठापना हे महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिले उदाहरण आहे.

यावेळी बोलताना मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या जागतिक महामारीचे सावट श्री गणरायाच्या या उत्सवावर सुद्धा आहेत. या महामारीमुळे जनता गणरायाच्या स्वागताबरोबरच उत्सव आणि विसर्जनही आनंदाने करू शकत नाही. त्यामुळे जनता दुःखी झाली आहे. गणपती हा विघ्नहर्ता म्हणून लौकिक आहे. गणपतीच्या आशीर्वादामुळे कोरोनाचे महाभयानक संकट लवकरच दूर होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

कोरोना संदर्भात आढावा बैठक झाली

या बैठकीला कागलच्या तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. डी. बी. शिंदे , जिल्हा परिषद बांधकामचे उपअभियंता श्री. ए. जी. चांदणे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे , कागलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी श्रेयस जुवेकर, आरटीओ चेकपोस्टचे व्यवस्थापक नीलेश भोसले आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post