रुई येथे बैतूलमाल कमिटीच्या वतीने डॉक्टर प्रशांत खोत यांचा सत्कार करण्यात आला.
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास :
इचलकरंजी: रूकडी येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रशांत खोत हे गेली दहा वर्ष रुई गावचे सेवा करीत आहेत. कोरोना च्या काळात सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा दिली असून आज ही ते सेवा करीत आहेत. त्यांच्या समाजसेवा कार्याची दखल घेऊन रुई येथील बैतूल माल कमिटीच्या वतीने डॉ. प्रशांत खोत यांना फुल पान करून सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष अल्लाउद्दीन जमादार, सल्लागार रमजान शेख, खजिनदार सलीम बेपारी, सलीम नदाफ, सदस्य समीर जंगले, जावेद शेख, अब्दुल मोमीन कमिटीचे सर्व सदस्य हजर होते. डॉक्टर प्रशांत खोत व बैतूल माल कमिटीच्या सामाजिक कार्याची सर्वत्र कौतुक होत आहे
Post a comment
0
Comments
Subscribe Us
Get all latest content delivered straight to your inbox.
0 Comments