पुणे उरळी देवाची :


 उरळी देवाची गावामध्ये पाण्यासाठी झुंबड.                     या मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका.


PRESS MEDIA LIVE : 

कोरोनाचे संकट कमी होण्यासाठी पुण्यात लॉकडाउन जाहीर झाला. पुणे शहर पूर्णपणे कडकडीत बंद झाले आहे. पण, पाण्यासाठी उरुळी देवाची गावामधील महिला, वृध्द, लहान मुले आदींची प्रचंड झुंबड उडाली आहे. त्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे तसेच टँकरचे चित्र पाहिले तर आपल्याला कडक उन्हाळ्याची आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

ए ग्रेड महापालिका असूनही दुष्काळी भागासारखी परिस्थिती उरुळी देवाची या गावातील लोकांची झाली आहे. अनेकदा निवेदने दिली, आक्रोश मांडला, प्रसार माध्यमांनी दखल घेतली. मात्र, महापालिका अजुनही जागी होईना आणि उरुळी करांची दैना संपेना.पाण्यासाठी ग्रामस्थांनी काही दिवसापूर्वी एकत्र येत काळी फित लावून पुणे महापालिकेचा निषेध केला. यामध्ये महिलांनी आपआपल्या घरासमोर आणि चौकाचौकात एकत्र येऊन डोक्यावर हंडा घेऊन महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

लाखो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे काम पूर्ण केले. मारत, अद्यापही ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. मंतरवाडीत पाणी येते परंतु उरुळीत पाणी नाही.  सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी टँकरला होणारी गर्दी टाळून पाइपलाइनने पाणी सुरू करावी, अशी मागणी भारिपचे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले.

सध्या संपूर्ण पुणे शहरावर कोरोनाचे संकट गडद आहे. त्यामुळे शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, पाण्यासाठी उरुळी देवाची गावात टँकर भोवती गर्दी वाढत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका नाकारण्यात येवू शकत नाही  ऊरूळी देवाची गावासाठी पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च पुणे महापालिकेच्यावतीने करण्यात आला आहे. शिवाय 10 दशलक्ष लिटरची पाण्याची टाकीही कचरा डेपोजवळ बांधून तयार आहे. कचराडेपो परिसरात नलीकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्याप्रमाणे ऊरूळी देवाची गावास का केला जाऊ शकत नाही, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

Post a comment

0 Comments