जयसिंगपूर : कोरोना चाचणी साठी जयसिंग मध्ये....

कोरोना चाचणीसाठी जयसिंगपूर मध्ये अॅंन्टीजेन टेस्टिंग सेंटर सुरू  रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाने घेतला निर्णय सार्वजनिक 

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-   यड्रावकर.


PRESS MEDIA LIVE :.  

जयसिंगपूर-कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या शासकीय टेस्टिंग लॅब वरती स्यॅब तपासणीसाठी ताण पडत असून चाचणीसाठीच्या सॅम्पल्स वाढल्यामुळे रुग्णांना तातडीने रिपोर्ट देणे आणि उपचार करणे गैरसोयीचे ठरत आहे, यामुळे आरोग्य विभागाने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभारण्यास सुरुवात केली असून जयसिंगपूर येथे कोल्हापूर रोडवरील डॉ.जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये सुरु होत असलेले अॅंन्टेजीक टेस्टिंग सेंटर याचाच भाग असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली,जयसिंगपूर मध्ये सदर टेस्टिंग सेंटर सुरू करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.केंम्पी पाटील, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ प्रमुख उपस्थित होते,
यावेळी या सेंटर विषयी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर केंम्पी पाटील म्हणाले आरोग्य विभागाच्या वतीने या ठिकाणी  विनामूल्य सेवा दिली जाणार आहे, अगदी कमी वेळेमध्ये कोरोनाचे निदान होण्यासाठी या टेस्टिंग सेंटरचा उपयोग होईल या सेंटरमुळे आरोग्य प्रशासनावरील ताण कमी होऊन नागरिकांना अल्पावधीत टेस्टिंग चा अहवाल प्राप्त होणार आहे, त्यामुळे कोरोना बाबत ची प्राथमिक लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तातडीने या टेस्टिंग सेंटरमध्ये संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दातार, गटविकास अधिकारी कवितके डॉ. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख विजय मगदूम, शिरोळ चे नगराध्यक्ष डॉक्टर अमरसिंह माने -पाटील, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. खटावकर यांच्यासहइंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉक्टर्स तसेच आरोग्य विभागाकडील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post