कोल्हापूर :


अवैद्य धंद्याच्या मुळावरच घाव घालण्याची तयारी पोलीस यंत्रणेने सुरू केली आहे.


PRESS MEDIA :  कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :

कोल्हापूर : मटका, जुगार, हातभट्ट्यांवरील वरवरची नव्हे तर मुळापर्यंत जाऊन कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिस यंत्रणेने सुरू केली. जप्त मुद्देमालासह मोबाईलच्या आधारे काळेधंदेवाल्यांचे कनेक्‍शन शोधून काढण्याच्या या मोहिमेकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. अवैध धंद्यावर मुळापर्यंत जाऊन कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सर्वच पोलिस ठाण्यांना दिले. या कामात यंत्रणेला सायबर पोलिसांची मदत मिळणार आहे. मटका जुगारासह हातभट्टीवर पोलिसांकडून छापे टाकले जातात. संबंधितांवर कारवाई करून मुद्देमाल जप्त केला जातो. यात मूळ मालकासह सक्रिय असणारे पाच वर्षांपूर्वी करवीर पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापा टाकला होता. त्यात फक्त शंभर दोनशेच्या घरात मुद्देमाल जप्त केला होता, मात्र तत्कालीन पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी या मटक्‍याचे कनेक्‍शन शोधण्याचे काम हाती घेतले. त्यांनी यातील पुणे, मुंबईसह परप्रांतातील साखळी शोधून कारवाई केली होती. याची तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी दखल घेत. उत्कृष्ट तपासाबाबत करवीर पोलिस ठाण्याला सन्मानित केले होते. यादवनगरातील संशयित सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यानंतर शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी त्याचे कोल्हापूर मटक्‍याचे इचलकरंजी, सांगली, सातारा, मुंबई, गुजरात कनेक्‍शन शोधून काढून 42 जणांवर कारवाई केली होती. त्याचबरोबर कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलिसांनी दहा दिवसांपूर्वी शेंडापार्क येथे छापा टाकून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून 20 किलो गांजा जप्त केला. कोल्हापूर गांजाचे विटा, पंढरपूर, सोलापूर, ओडिसा, आंध्र प्रदेश कनेक्‍शन शोधून काढले. त्याचबरोबर एक-दोन महिन्यांत मटका, जुगार व दारूअड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यात जप्त केलेला मुद्देमालाच्या मदतीने मूळ मालकापर्यंत पोहचण्याचे काम पोलिस यंत्रणेने सुरू केले आहे. यात संशयितांकडून जप्त केलेले मोबाईल संच सायबर पोलिस ठाण्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेेPost a comment

0 Comments