AdSense code इचलकरंजी :

इचलकरंजी :

इचलकरंजीतील माजी उपनगराध्यक्ष  कोरोना पॉझिटिव्ह.PRESS MEDIA LIVE :  इचलकरंजी :   ( मनु फरास ) :

कोरोनाबाधितांचा दररोज वाढणाऱ्या आकड्याने वस्त्रनगरी हादरली आहे. शहरातील प्रत्येक सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी असणाऱ्यां माजी उपनगराध्यक्षांचा खासगी लॅबमधील कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळ पर्यंत प्राप्त झालेल्या अहवालामध्ये माजी उपनगराध्यक्षांसह चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबधितांचा आकडा आता १०२ वर पोहचला आहे. माजी उपनगराध्यक्ष वगळता इतर तिघे हे सोडगे मळा परिसरातील कोरोना बाधितांच्या संपर्कात आले असल्याचे आरोग्य अधिकारी यांनी सांगितले असून यामध्ये एका महिलेचा व दोन पुरुषांचा समावेश आहे.

लॉकडाऊन संदर्भातील बैठकीतील दुसरा पॉझिटिव्ह
शहर सनियंत्रण समितीच्या बैठकीत उपस्थित असणाऱ्या माजी नगरसेवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. या बैठकीतील उपस्थितांना होम क्वारंटाईन होण्याचा आदेश प्रशासनाने दिला होता. दरम्यान या बैठकीला माजी उपनगराध्यक्षही उपस्थित होते. त्यांनी खासगी लॅबमध्ये तपासणी करून घेतली असता शनिवारी दुपारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांचे अहवाल आजच निगेटिव्ह आले आहेत.

Post a comment

0 Comments