इचलकरंजी आमदार प्रकाश आवाडे यांची पत्रकार परिषद पार पडली.

आज ताराराणी पक्ष कार्यालय इचलकरंजी येथे *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांची पत्रकार परिषद पार पडली.


PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी ( मनु फरास ) :

आयजीएम कडील त्या *42 जणांना कोविड युध्दात सहभागी करुन घेण्यासंदर्भात रविवारपर्यंत शासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास सोमवार (27 जुलै) पासून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी पत्रकार बैठकी बोलताना दिला.* या प्रश्‍नी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्या 42 जणांना सेवेत घेण्याचे आदेश दिल्यानंतरही रुग्णालयाकडून टाळाटाळ केली जात असल्याने आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
*दोन अतिदक्षता विभाग आणि 30 स्पेशल रुममध्ये सुविधा असून त्या वापरात घेण्याच्या सूचना करुनही रुग्णालय त्याकडे दुर्लक्ष करत आहे.* त्यामुळे वैद्यकिय अधिक्षक *शेट्ये यांची तातडीने उचलबांगडी करण्याची मागणी केली आहे.*
त्यामुळे रुग्णालयातील पदाधिकार्‍यांच्या नाकर्तेपणाच्या विरोधात आणि शासनाने त्या 42 जणांबाबत रविवारपर्यंत निर्णय न दिल्यास 27 जुलैपासून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी दिला आहे. यावेळी प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments