मुंबई :

आणि पायाखालची जमीनच सरकली.


            

PRESS MEDIA LIVE :

लाँकडाऊन....  सुरुवातीला वाटलं एखाद्या महिन्यात सगळं रुळावर येईल पण लाँकडाऊनचा अवधी वाढत गेला आणि पायाखालची जमीनच सरकली

कमाई नाही, पुढे कसं होईल?
हा यक्षप्रश्न कलाकार,तंत्रज्ञासमोर उभा राहिला.

अनलाँक १ सुरु झालाय,
तरीही लगेच प्रोजेक्ट सुरु होतील ही शक्यता कमीच आहे.
पुढील आयुष्य जगायचं कसं?

या परिस्थितीत आपण एकमेकांना मदत करायला हवी या जाणिवेने,सहकारी मित्रांना पुढील काही महिने मदत करण्याचा निश्चय केला गेला, या कामात मुंबई एकी ग्रूप आणि कलांगण सांस्कृतिक मंच यांनी पुढाकार घेतला इतर काही संस्था आणि मदतीचा हात पुढे करणारे महानुभाव यांच्या सहाय्याने मदतीचे कार्य सुरु झाले.
आज मालाड, कांदिवली, बोरीवली येथील कलाकार,तंत्रज्ञांना प्राना फाउंडेशन,श्री.राजन चेऊलकर, मुंबई एकी ग्रूप आणि कलांगण सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने धान्य किटचे वाटप करण्यात आले.
श्री. राजन चेऊलकर (निर्माता) , श्री.विजय पाटकर (अभिनेता,दिग्दर्शक, निर्माता) आणि प्राना फाउंडेशनच्या
डाँ.प्राची पाटील यांचे मुंबई एकी ग्रूप आणि कलांगण सांस्कृतिक मंच कडून आभार.                    पत्रकार - गणेश तळेकर

Post a comment

0 Comments