प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली.. 1मे महाराष्ट्र दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट)पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे जनसपंर्क कार्यालयाचे उदघाटन सांगली येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिनभाऊ खरात यांच्या हस्ते करण्यात आले
जनसपंर्क कार्यालय उदघाटन कार्यक्रम अल्पसंख्यांक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. फारूकभाई मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी प्रदेश सचिव अक्षय चोपडे, प्रदेश मुख्य संघटक फिरोज मुल्ला (सर ), पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
सचिनभाऊ खरात जनसमोदयाला सबोधित करताना म्हणाले या देशात आदिवासी, दलित, मुस्लिम याच समाजावर सतत अन्याय अत्याचार होत आले आहेत आणि होतायत परंतु तरीही या समाजातील लीडर समाजाचे प्रश्न मार्गी लावण्या ऐवजी स्वतः आमदार खासदार होण्यासाठी इतर पक्षात जावून स्वतः मालामाल होतायत पण रिपाई (सचिन खरात गट )जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करत आहे त्या संघर्षाला जनतेने साथ दिली पाहिजे आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना एकत्र येण्यास संघितले होते आणि एकत्र येऊन न्याय मिळवण्यासाठी लढा उभा करणं काळाची गरज आहे आणि अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला आम्ही सोबत घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणार आहोत असे सचिनभाऊ खरात यांनी आस्वाशीत करत आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष वलीभाई शेख यांनी केले यावेळी अल्पसंख्यांक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ खरात यांच्या हस्ते वलीभाई शेख,सौ. रेश्माताई मुल्ला,मा. रेहानाताई मिठाईवाले, प्रा. शाहीनताई मुल्ला,adv.सबिहाताई तांबोळी आदी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देवून पदांची नियुक्ती करण्यात आल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पक्षाचे राज्य मुख्य संघटक फिरोज मुल्ला (सर )यांनी केले व आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आकाश कांबळे,पुणे शहर उपाध्यक्ष अक्षय कटके, उपाध्यक्ष अशोक पवार, अल्पसंख्यांक आघाडी पुणे शहर अध्यक्ष हकीकभाई शेख,कोल्हापूर कमगार आघाडी जिल्हाध्यक्ष तानाजी शिंदे, उपाध्यक्ष दिलीप कुदळे,आदी पदाधिकारी नेते व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते