उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल पदक व विशेष सेवा पदक बहाल .
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पिंपरी दि. :- १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे पोलीसांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.यासर्व पोलीस अधिकारी व आमदारांना पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करून गौरव केला .
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना नुकताच पोलीस महासंचालक पदक आणि विशेष सेवा पदक प्राप्त झाले. या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष सत्कार केला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या वीसहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पदक देऊन सन्मान करण्यात आला. उत्कृष्ठ सेवा कालावधीबद्दल पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सध्या कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अमंलदार विकास राठोड, नितीन ढोरजे तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये ०२ वर्षेपेक्षा जास्त सेवा कालावधी यशस्वीरित्या पुर्ण केल्याने पोलीस महासंचालक, मुंबई यांचेकडून विशेष सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी , पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदिप खलाटे, पोलीस उपनिरीक्षक गंगाधर ढगे, पोलीस उपनिरीक्षक अहमद मुल्ला, पोलीस उपनिरीक्षक विकास सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव या सर्वांना सन्मानित करण्यात आले यावेळी पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त परि-१ स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त मुख्यालय विवेक पाटील, पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापु बांगर, तसेच सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त सतीश कसबे, सहा पोलीस आयुक्त सुनिल कु-हाडे उपस्थित होते.