कोरोची येथील अट्टल वाहन चोरट्यास अटक करून साडे आठ लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कोरोची येथील मोटारसायकल चोरटा नागेश हणमंत शिंदे याला अटक करून त्याच्या कडील साडे आठ लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या .

वरिष्ठांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास पथके तयार केली.त्या मध्ये पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी एक तपास पथक तयार करून वाहन चोरट्यांची माहिती घेत असताना पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना पोलिस रेकॉर्ड वरील गुन्हेगार कोरोची येथील नागेश शिंदे याने राजारामपुरी येथून मोटारसायकल चोरली असून त्याची विक्री करण्यासाठी गोकुळ शिरगाव येथील कमानी जवळ येणार असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गोकुळ शिरगाव येथील कमानी जवळ जाऊन सापळा रचून नागेश शिंदे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरची मोटारसायकल राजारामपुरी येथून चोरल्याचे सांगितले.त्याच प्रमाणे पंढ़रपूर येथून एक बोलेरो व सांगोला येथून चारचाकी गाडी चोरी केल्याची कबुली दिली.त्याबाबत त्याच्यावर राजारामपुरी ,पंढ़रपूर आणि सांगोला पोलिस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.

नागेश शिंदे यांच्या कडुन राजारामपुरी,पंढ़रपूर आणि सांगोला पोलिस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले.आरोपी नागेश शिंदे यांच्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यात वाहन चोरीचे व इतर चोरीचे असे 110 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी नागेश शिंदे यांच्या कडुन साडे आठ लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्याला पुढ़ील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे,पोलिस वैभव पाटील,विशाल खराडे,गजानन गुरव,हिंदुराव केसरे,प्रदिप पाटील,शिवानंद मठपती,अरविंद पाटील,संतोष बर्गे,योगेश गोसावी,परशुराम गुजरे,सचिन जाधव आणि महेंद्र कोरवी यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post