प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री संत सेनाजी महाराज नाभिक समाज मंडळ तारदाळ खोतवाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नरवीर शिवाजी काशीद यांच्या 395 व्या जयंतीनिमित्ति जलद सुंदर दाढी करणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत वेगवेगळ्या भागातून स्पर्धकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला होता . यामध्ये परीक्षकाकडून स्पर्धकांना दिलेल्या मर्यादित वेळेत ग्राकांची आकर्षक जलद व सुंदर दाढी करावयाची होती
सदर स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्ष ,सुनील इंगळे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र शिंदे हातकलंगले तालुका अध्यक्ष बाबासाहेब शिंगे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन सूर्यवंशी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबुराव जाधव सुनील अकॅडमीचे सुनील दळवी व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच परीक्षकांनी दिलेल्या गुणांच्या आधारे प्रथम क्रमांक सुभाष संकपाळ द्वितीय क्रमांक राहुल माने आणि तृतीय क्रमांक शिवराज शेंडे यांनी मिळवला असून विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले आहे
सदर स्पर्धेत एका मुलींने सहभाग घेऊन महिला सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर असल्याचे दाखवून दिल्याची चर्चा नागरिकातून होती.
यावेळी नियोजन मंडळाचे सदस्य प्रसाद खोबरे, रंणजीत पवार डेप्युटी सरपंच मृत्युंजय पाटील मा. लोक नियुक्त सरपंच यशवंत वाणी ग्रामपंचायत सदस्य नितीन खोचरे चंद्रकांत तांबवे सुधाकर कदम मा.भारत निर्माणचे अध्यक्ष विजय जाधव यांच्यासह श्री संत सेनाजी महाराज नाभिक समाज मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सूर्यकांत जाधव व गौरव जाधव यांनी केले