मोदींनी जनतेचा भ्रमनिरास केला - इंडिया फ्रंटच्या नेत्यांचा आरोप

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे देशातील जनतेचा भ्रमनिराश झाला आहे. मोदी आणि भाजप नेते दर वेळी विकासाचे मुद्दे सोडून समाजाचे ध्रुवीकरण करणारी भाषणे देवून समाजामध्ये द्वेश पसरवण्याचे काम करतात. त्यामुळे या निवडणुकीत देशातील जनता मोदी सरकारला घरी बसवेल, असे प्रतिपादन इंडिया फ्रंटच्या विविध नेत्यांनी केला.

पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी, इंडिया फ्रंटचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुणे लोकसभा मतदार संघाचे प्रचार प्रमुख मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, आपचे मुकुंद किर्दत, शिवसेनेचे प्रशांत बधे, शिवसंग्राम फाऊंडेशनचे तुषार काकडे, माजी आमदार दीप्ती चवधरी, रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष राम डंबाळे, भीमशक्ती संस्थेचे चंद्रकांत हंडोरे, अंबुज पार्टी ऑफ इंडियाचे  राज्य प्रवक्ते रावसाहेब भाऊसाहेब साळवी, माध्यम समन्वयक राज अंबिके आदी उपस्थित होते. यावेळी काकडे यांनी शिवसंग्राम फाउंडेशनच्या वतीने रविंद्र धंगेकर यांना पाठींबा देत असल्याचे पत्र जोशी यांना दिले.  

गोपाळ तिवारी म्हणाले, मोदींना दहा वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोख मांडता येत नाही, हे दुदैव आहे. आज ते विकासावर न बोलता वेगवेगळ्या विषयावर बोलत आहेत. पाकिस्तानला मोदी सत्तेवर येणेच हवे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बालीशपणे बोलतात, त्यांनी आरएसएसच्या प्रदीप कुरुलकरांनी पाकिस्तानला दिलेल्या माहितीवर बोलावे. कुरुलकरांवर भाजपचे नेते बोलत नाहीत. देशातली जवळपास मोठी विमानतळे, खनिजे, कोळशाच्या  खाणी, बंदरे, ऊर्जा निर्मितीची सगळी कंत्राटे, प्रसिध्दी माध्यमे व आयात-निर्यात या सगळ्यांवर अदाणी-अंबानींचा कब्जा आहे. त्यामुळेच त्यांचे कडेच प्रचंड काळा पैसा आहे. या विषयी मोदींना नक्कीच खरी गॅरंटी असल्याचा आरोप तिवारी यांनी केला.  

आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत म्हणाले, अण्णा हजारेंचे 2014 मध्ये आंदोलन झाले. त्याचा आधार घेवून मोदी सरकार सत्तेवर आले. त्यावेळी मोदींनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे लोकांचा भ्रमनिराश झाला आहे. मोदींनी आणलेली स्मार्ट सिटी फसली आहे. मोदी सरकार चौकशीच्या नावाने छळाचे तंत्र अजमावत आहेत. त्यामुळे लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आपने कोणतीही अपेक्षा न ठेवता, महाविकास आघाडी व इंडिया आघाडीला समर्थन दिले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रशांत बधे म्हणाले, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी आंदोलन करून चांदणी चौकाचे काम करण्यास भाग पाडले. स्मार्ट सिटी, पीएमपीएमएलचा ढिसाळ कारभार सुरू आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे काम भाजपच्या नगरसेवकांकडून बंद पाडण्यात आले. नदी सुधार प्रकल्पाचेही काम रखडले आहे. भाजपच्या भुलथापा सुरू असून शिवसेना फोडल्याचा राग मतदानातून व्यक्त होईल.

तुषार काकडे म्हणाले, मराठा समाजाचा आवाज दाबण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. आंतरावली सराटी येथे झालेला लाठीहल्ला समाज विसरलेला नाही. आम्हाला जातीचा नव्हे तर मतीचा उमेदवार हवा आहे.

-------------------------

चंदन नगर येथे शरद पवारांची सभा

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (10 मे) साडेतीन वाजता ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा होणार आहे. या सभेस काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. तसेच युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांचा वडगावशेरी, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा या मतदार संघात तर खासदार सुप्रिया सुळे यांचा कोथरूड, शिवाजी नगर, पर्वती मतदार संघात रोड शो होणार असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

अरविंद शिंदे 

अध्यक्ष 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी 

९८२२०२०००५

Post a Comment

Previous Post Next Post