मुरगुड येथे दै.सकाळच्या पत्रकारांला मारहाण प्रकरणी मुरगुड पोलिसांत तिघांच्या विरोधात गुन्हा.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर /मुरगुड - आमच्या विरोधात बातमी का छापली म्हणुन दै.सकाळचे पत्रकार प्रकाश सखाराम तिराळे (42.रा.कुरुकली ,ता.कागल) यांना मारहाण केल्या प्रकरणी राजेखान कादरखान जमादार ,आसिफखान आसिदखान जमादार आणि संदिप अशोक सणगर (तिघे रा.मुरगुड) या तिघांच्या विरोधात मुरगुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची फिर्याद प्रकाश तिराळे यांनी मुरगुड पोलिसांत दिली.

अधिक माहिती अशी की,प्रकाश तिराळे हे दै.सकाळचे मुरगुडचे पत्रकार आहेत.वरील तिघांनी मिळून आमच्या विरोधात बातमी का छापतोस म्हणून प्रकाश यांना  मारहाण करून त्यांच्या कंरगळीस दुखापत होऊन खिशातील चष्माची मोडतोड ही करण्यात आली.हा प्रकार गुरुवार दि.09/05/2024 रोजी साडे पाचच्या सुमारास मुरगुड येथे गणपती मंदीर समोर असलेल्या मेडके बेकरी समोर घडला होता.प्रकाश तिराळे हे मुरगुड येथे आपल्या कामानिमित्त जात असताना राजेखान जमादार यांने आमच्या विरोधात बातमी का छापली म्हणून प्रकाश यांच्या कानशीलात लावली तेव्हा प्रकाश यांनी तुमची काय तक्रार असल्यास संपादकाशी संपर्क साधा.असे म्हणताच राजेखान यांने आपल्या दोघां साथीदारांना बोलावून प्रकाश यांना मारहाण केली.याची फिर्याद मुरगुड पोलिसांत दिली असता पोलिसांनी वरील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याचा तपास करवीरचे  उपविभागीय पोलिस अधिकारी श्री .सुजितकुमार क्षीरसागर करीत आहेत   

Post a Comment

Previous Post Next Post