आमदार झालात, आता खासदार व्हा कसबा वासियांचा धंगेकरांना आशीर्वाद

प्रेस मीडिया लाईव्ह :

‘कसबा जिंकून आमदार झालात, आता खासदार होऊन पुण्याचे विकासाचे प्रश्न सोडवा, त्यासाठी आमचे आशीर्वाद तुम्हाला आहेत.’ अशा भावना महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांना कसबावासियांनी बोलून दाखवल्या. कसबा विधान मतदार संघातील प्रभाग क्र १५ व २९ परिसरात झालेल्या पदयात्रेत नागरिक आपल्या भावना व्यक्त करत होते. 

ही पदयात्रा अखिल मंडई मंडळाच्या श्रींची आरती करून सुरु झाली. मंडईतच असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास धंगेकरांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले आणि मग पदयात्रा पुढे सरकत राहिली. 

अखिल मंडई मंडळापासून सायंकाळी ६ वाजता सुरु झालेली ही पदयात्रा बदामी हौद, शिंदे आळी, काळा हौद, व्हाईट हाऊस, सुभाषनगर, विश्व हॉटेल, लोकमान्य नगर, अशोक विद्यालय, गांजवे चौक, राजेंद्र नगर, दत्तवाडी चौक, अरूण धिमधिमे यांच्या ऑफिस वरून शास्त्री पुतळा येथे समाप्त झाली.

आ. रवींद्र धंगेकर यांच्या कसबा विधानसभा मतदार संघातच पदयात्रा असल्याने पदयात्रेच्या मार्गात प्रत्येक चौकात मोठी गर्दी जमत होती. मार्गावरील अनेक मंदिरांमध्ये धंगेकरांनी दर्शन घेतले तसेच अनेक गणपती मंडळांना भेटी देऊन तेथे आरती केली. या पदयात्रेतील विशेष भाग म्हणजे धंगेकर यांच्या मतदार संघातील अनेक नागरिक ‘काम झाले, धन्यवाद, आपल्याला सांगितलेले काम पूर्ण झाले’ असे सांगत धंगेकरांना धन्यवाद देत होते. तसेच अनेक जण सेल्फी काढत होते. 

‘हा मतदार संघ अतिशय दाट वस्तीचा असून येथे विकास प्रकल्प राबवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दिलेल्या मुदतीत दूर करतो. नागरिकांचे प्रश्न सोडवल्यावर त्यांना आवर्जून कळवतो, मात्र अजून खूप टप्पा गाठायचा आहे, अशा भावना धंगेकरांनी व्यक्त करून धंगेकर म्हणाले की, आंबील ओढ्याला पावसाळ्यात मोठा पूर येतो व नागरिकांचे नुकसान होते हा पुरापासुनचा धोका टाळण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यावर मी भर देईन असे ते म्हणाले. 

या पदयात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व पक्षांचे झेंडे, फटाके, ढोल – तशा यामुळे वातावरून भारून गेले होते. अनेक ठिकाणी धंगेकरांना औक्षण केले जात होते. अभिजित बारावकर यांच्या निवडणूक कचेरीचे देखील मोठ्या जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी अंकुश काकडे, अण्णा थोरात, अश्विनी कदम, अभिजित बारावकर, बाळासाहेब गरुड, बाळासाहेब अमराळे, बाळासाहेब मारणे, बुवा नलावडे, अक्षय माने, गणेश नलावडे, सुधीर काळे, बंडू शेडगे, प्रविण करपे, मच्छिंद्र उत्तेकर, संदीप गायकवाड, शुभम लाड, वैजयंती घोडके, प्रशांत गांधी, संतोष जोशी, सोनाली जाधव, भोला वांजळे, शिवराज भोकरे, मदन कोठुळे, दीपक पोकळे, रोहन पायगुडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

अरविंद शिंदे अध्यक्ष 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी 

९८२२०२०००५

Post a Comment

Previous Post Next Post