इचलकरंजी शहरात मंगळवार ७ मे रोजी भरणारे आठवडा बाजार बुधवार दि.८ मे रोजी भरणार.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

       मा. भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहिर करणेत आला असून सदर कार्यक्रमानुसार मंगळवार दि.०७/०५/२०२४ इ. रोजी मतदान आणि मंगळवार दि.०४/०६/२०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

          कोल्हापूर जिल्हयातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे मतदान व मतमोजणी शांततेत, सुव्यवस्थेमध्ये पार पाडणेसाठी ज्या गावांमध्ये मतदान व मतमोजणी दिवशी आठवडी बाजार भरतो, त्या गावांमध्ये सदर दिवशी भरणारे बाजार, जत्रा बंद ठेवण्यास अथवा पुढे ढकलणेस मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिले मान्यतेनुसार मा. अपर जिल्हा दंडाधिकारी, कोल्हापूर यांचे  निर्देशानुसार, कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर तहसिलदार इचलकरंजी यांनी सदर दोन्ही दिवशी इचलकरंजी शहरातील बाजार बंद ठेवणेबाबत आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार इचलकरंजी शहरातील आठवडी बाजारातील विक्रेते, व्यावसायीक व नागरीकांना आवाहन करणेत येते की, इचलकरंजी हद्दीतील 

१) अहिल्याबाई होळकर, विकली मार्केट, 

२) जवाहर नगर पाण्याची टाकीजवळ व 

३) आण्णा रामगोंडा पाटील शाळेसमोरील मार्केट या ठिकाणाचे सर्व आठवडा बाजार मंगळवार दि. ०७/०५/२०२४ रोजी बंद ठेवणेत येत आहे. सदरचा आठवडा बाजार बुधवार दि. ०८/०५/२०२४ रोजी भरविणेत येणार आहेत.

      तरी सर्व शहरवासीयांनी सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करणेत येत आहे.


      

Post a Comment

Previous Post Next Post