इडीच्या पथकाने व्हिआयपीएसच्या प्रमुखावर छापा टाकून 5 कोटी 32 लाखांचा मुद्देमाल जप्त.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -गुंतवणूकदारांना फॉरेक्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या व्हिआयपीएसच्या एंजटावर ईडीच्या पथकाने शुक्रवार (ता.3)  रोजी उचगाव आणि उद्यमनगर येथे छापा टाकून केलेल्या कारवाईत या कंपनीचा एंजट असलेल्या तोरस्कर बंधुंची 5 कोटी 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कंपनीचे प्रमुख विनोद कुटे आणि त्यांच्या साथीदारांनी फॉरेक्स ट्रेडिंगद्वारे दरमहा 3% परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करून 2019 पासून कोल्हापुरात गुंतवणूक घेणे चालू केले.उचगाव परिसरातील मणेरमळा येथील तोरस्कर बंधु एंजट म्हणून काम करीत असे.त्यांनी उद्यमनगर परिसरात कंपनीचे कार्यालय थाटले होते.त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागातुन 100 / कोटीच्यावर गुंतवणूक जमा करून घेतल्याचा तक्रारदारांचा अंदाज आहे.मे .2023 ला याबाबत पुणे येथील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून ईडी कडुन समांतर तपास चालू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post