उजळाईवाडी येथे तरुणीची आत्महत्या.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - उजळाईवाडी येथे रहात असलेली सुप्रिया बंजरंग डोईफोडे (वय.28 रा.तुळजाभवानी नगर ,शाहु नाका समोर ,उजळाईवाडी को.) यातील मयत हिने शनिवार दि.04,/05/2024 रोजी साडेतीनच्या सुमारास रहात्या घरात छताच्या पाईपला साडीने गळफास लावून आत्महत्या केली.नातेवाईकांनी गळफास सोडवून बेशुध्दावस्थेत तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाला याची फिर्याद बंजरग भिमराव डोईफोडे (वडील) यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली . या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

अधिक माहिती अशी की,यातील मयत सुप्रिया हिचे MSC.प्रर्यत शिक्षण झाले असून तिचे वडील पेट्रोल पंपावर काम करता तर भाऊ अक्षय हा पुणे जॉब करीत असून मोठी बहीण विवाहित आहे.

Post a Comment

Previous Post Next Post