श्री. प्रदीप मतंवा परदेशी हेच पुणे शहर काँग्रेस ओ. बी. सी. विभागाच्या अध्यक्ष पदी कायम


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे 
श्री. प्रदिप मतंवा परदेशी यांची अधिकृतरित्या शिफरशी नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभागाचे अध्यक्ष श्री. भानुदास माळी यांनी पुणे शहर काँग्रेस ओ. बी. सी. विभागाचे अध्यक्ष पदी निवड केली असून आज दि. १२ एप्रिल २०२४ रोजी काही वृत्त पत्रांमध्ये मावळते अध्यक्ष श्री. प्रशांत सुरसे हेच अध्यक्ष म्हणून राहतील व श्री. प्रदीप परदेशी यांच्या निवडीला स्थगिती देत असल्याचे वाचण्यात आले. 

परंतु श्री. प्रशांत सुरसे हे गेले ३ वर्षांपासून ओ.बी.सी. विभागाच्या अध्यक्ष पदी कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळी पूर्ण झाला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभागाकडून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीला अद्याप पर्यंत नियमानुसार (प्रोटोकॉलप्रमाणे) श्री. प्रदीप परदेशी यांच्या निवडीच्या स्थगितीला कोणत्याही प्रकारचा निरोप अथवा पत्र प्राप्त न झाल्यामुळे श्री. प्रदीप मतंवा परदेशी हेच पुणे शहर काँग्रेस ओ. बी. सी. विभागाच्या अध्यक्ष पदी कायम राहतील असे या पत्रकाद्वारे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले आहे.  

Post a Comment

Previous Post Next Post